कोल्हापूर जिल्हा परिषदेत आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात

कोल्हापूर/प्रतिनिधी :- कोल्हापूरात जिल्हा परिषदेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी ६.३०ते८.३० पर्यंत योगाची प्रात्यक्षिक सादर करण्यात आली.दरम्यान योग शिक्षिका श्रीम. राजश्री पाटील यांनी योगासनाचे विविध प्रकार प्रात्यक्षिकेव्दारे करुन घेतले व योगासन विषयी माहिती सांगितली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमल मित्तल , सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव ,जिल्हा कृषीअधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी ,पशुसंवर्धन अधिकारी डॉ संजय शिंदे यांच्यासह पदाधिकारी ,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!