कोल्हापूरात बेरोजगार तरुण रस्त्यावर: जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

कोल्हापूर, प्रतिनिधी
देशात सध्या आर्थिक मंदीमुळे लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत. या वाढत चालेल्या बेरोजगारीला सरकारच जबाबदार आहे. असा आक्रोश व्यक्त करत
भगतसिंग रोजगार हमी योजना पास करा अथवा २५ हजार बेरोजगार भत्ता द्या, महापरीक्षा पोर्टल रद्द करा, राज्यातील ३ लाख आणि केंद्रातील २४ लाख रिक्त पदे लवकर भरा,पोलिसांची १३ हजार, शिक्षकांच्या १२ हजार, प्राध्यापकांची ९ हजार रिक्त पदे लवकर भरा या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी आज ऑल इंडिया यूथ फेडरेशनच्या वतीने बेरोजगारीच्या प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चा बिंदू चौकातून सुरू होऊन व्हीनस कॉर्नर, बसंत बहार रोड मार्गी जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. तर हातात ऑल इंडिया यूथ फेडरेशनचे झेंडे घेतलेले हजारों युवक, युवतींनी सहभाग मोर्चाचे आकर्षण ठरले. दरम्यान वाढत चाललेल्या बेरोजगारीबाबत आक्रोश व्यक्त करत
सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.तर सदर मागण्यांचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी सध्या आर्थिक मंदीमुळे वाढत चालेल्या बेरोजगारीला सरकार जबाबदार आहे. महाराष्ट्रात सध्या २ लाख ७२ हजार सरकारी पदे रिक्त आहेत, तरी सरकार फक्त भरतीचे आश्वासनच देत आहे. या सरकारचा मेगा भरतीचा फुगा आता फुटला आहे. महापरीक्षा पोर्टल काढून भरती चालू केली, पण संपूर्ण भरती केलीच नाही. यामुळे युवकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. अशा भावना ऑल इंडिया यूथ फेडरेशनच्या वतीने गिरीश फोंडे यांनी व्यक्त केल्या.
मोर्चात प्रशांत अंबी,आरती रेडेकर, धीरज कटारे, हरीश कांबळे, मानतेश राऊत,जावेद तांबोळी, विशाल मोरे, रवि जाधव, स्नेहल कांबळे, अभिजित लोहार, प्रियंका कांबळे, स्वप्नील गावडे, अजय पाटील, राखी कदम, सूरज कांबळे, रमेश पवार, पृथ्वीराज शिंदे,रोहित कांबळे, विनय मोहिते, स्वप्नील गुंटे, मोहिते,निवृत्ती गुरव आदींसह हजारों तरुण सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!