कोल्हापुरात उद्या शिवसेना शहर कार्यकारणीची ५ हजार दुचाकींची भगवी रॅली

कोल्हापूर /प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचे नाते होते. यासह आई अंबाबाईवर त्यांची श्रद्धा होती. ते नेहमी आपल्या दौऱ्यांना, प्रचाराना आई अंबाबाईच्या दर्शनाने सुरवात करायचे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीची घोषणा झाली असून, प्रचाराची रणनितीही ठरवण्यात येत आहे. युतीच्या प्रचाराचा धुरळा कोल्हापुरातून उडवून देण्याचं निश्चित करण्यात आले असून, त्याची सुरवात आई अंबाबाईच्या दर्शनाने होणार आहे. युतीच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि मुख्यमंत्री नाम. देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेने होणार आहे. उद्या दि.२४ मार्च रोजी सायं.५ वाजता तपोवन मैदान, कोल्हापूर येथे या सभेचे आयोजन करण्यात येत आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर आज आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यानी सभा स्थळाची पाहणी केली. तपोवन मैदानावर सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून, मैदानावर व सभा मार्गावर भगवे झेंडे लावण्यात येत आहेत. यासह मैदानावर सुमारे भव्यदिव्य व्यासपिठ उभारण्यात आले आहे. यासह २ लाख नागरिक बसतील अशी बैठक व्यवस्था, ठिकठिकाणी स्क्रीन लावण्यात येत आहेत. उद्या नियोजित वेळेत सभेस सुरवात होणार असून, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब काय बोलणार? याकडे समस्त महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागले आहे. युतीची होणारी ही पहिलच सभा न भूतो न भविष्यात: करण्याचा चंगच शिवसेना भाजप युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बांधला असून, कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाप्रमाने पदाधिकार्यांचे मेळावे घेण्यात आले आहे. शिवसेना भाजप युतीचे मंत्री आणि पदाधिकारी या सभेस संबोधित करणार आहेत. या सभेकरिता कोल्हापूर शहरातून जास्तीत जास्त शिवसैनिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले व युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शहर शिवसेनेच्या पदाधिकार्यांच्या वतीने शहरातून भव्य दुचाकी रॅली काढून सभास्थळी प्रस्थान करणार आहेत. या रॅलीमध्ये पाच हजार दुचाकी सह शहरातून सुमारे दहा हजार शिवसैनिक सहभागी होणार आहेत. यावेळी माजी उपमहापौर उदय पवार, शिवसेना शहरप्रमुख माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, युवानेते ऋतुराज क्षीरसागर, जयवंत हारुगले, दीपक गौड, किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, रमेश खाडे, अनिल पाटील, गजानन भुर्के, रणजीत जाधव, अविनाश कामते, ओंकार परमणे आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *