कोल्हापुरात आज शरद पवार यांची खासदार धंनजय महाडिक यांच्या प्रचारार्थ होणार जाहीर सभा

कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापुर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक याच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा माजी केंदीय मंत्री शरद पवार यांची आज सायंकाळी ५ वाजता गांधी मैदान येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेस राष्ट्रवादी काँग्रेससह महाआघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकारी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
येत्या २३एप्रिल रोजी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेसाठी निवडणूक होणार आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे खासदार धनंजय महाडिक तर हातकणंगले मतदारसंघातून महाआघाडीचे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी निवडणूक रिंगणात आहे. या दोन्ही मतदारसंघात पक्षप्रमुखासह मान्यवर उमेदवारांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे.दरम्यान आज खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची मान्यवरांसोबत सायंकाळी ५वा.गांधी मैदानावर भव्य जाहीर सभा होणार आहे.शरद पवार आजच्या सभेत विरोधकांवर काय तोफ डागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *