कोल्हापूरात आजपासून पश्चिम महाराष्ट्र विभागीय अंधाच्या क्रिकेट स्पर्धा

कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूरात क्रिकेट असोसिएशन फाँर द ब्लाइंड आँफ महाराष्ट्र आयोजित आणि सोनी पिक्चर नेटवर्क इंडिया प्रा.लि.यांच्या सहकार्याने पश्चिम महाराष्ट्र विभागीय अंधाची क्रिकेट स्पर्धा दिं.१३व१४ एप्रिल रोजी सागरमाळ क्रिकेट अँकँडमी मैदानावर भरविण्यात आल्या आहेत. अशी माहिती सचिव रमाकांत साटम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अंध क्रिकेट खेळांडूचे मनोधैर्य वाढविण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र विभागीय अंधांच्या क्रेकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल असून या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर येथील बलाए संघानी सहभाग नोंदवला आहे. तर यामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा ही सहभाग आहे.हे सामने१०षटकांचे असून एकूण७सामने साखळी पद्धतीने खेळविले जाणार आहेत. या सर्व खेळांडूमधून पश्चिम महाराष्ट्र संघाची निवड करण्यात येणार आहे.तसेच सदर संघ आँक्टोबर महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत. आतापर्यंत महाराष्ट्राचे ७ खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघासाठी खेळले आहेत. तर ही स्पर्धा क्रिकेट असोसिएशन फाँर द ब्लाइंड इन इंडिया व वल्ड ब्लाइंड कौन्सिल यांच्या नियमानुसार खेळवल्या जाणार असून या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दिं.१४ एप्रिल रोजी ४वा.होणार असल्याचे साटम यांनी यावेळी स्पष्ट केल.तर या स्पर्धेचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी यावेळी केले.
पत्रकार परिषदेला खजिनदार दादाभाऊ कुटे,प्रशिक्षक अजय मुनी,डॉ. भाविक पारेख(फिजीओ)उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *