ह्युमन राईट मिरर
Monday, 22 Apr 2019

कोल्हापूरात टू व्हिलर मेकॅनिक एज्युकेशन ॲण्ड रिसर्च फौंडेशनतर्फे मेकॅनिक महामेळावा

कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूरात मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक भवन येथे जिल्हा टू व्हिलर मेकॅनिक एज्युकेशन ॲण्ड रिसर्च फौंडेशनच्या वतीने भविष्यात चांगला मेकँनिक घडावा या हेतूने घेण्यात आलेला मेकॅनिक महामेळावा २०१९ पार पडला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महालक्ष्मी होंडा सर्व्हिसेसचे नितीन मिरजे होते.तर या मेळाव्याला जिल्ह्यातील हजारो मेकॅनिकांनी सहभाग नोंदवत भविष्यात पर्यावरणपूरक टू व्हीलर बनविण्याचा संकल्प करण्यात आला. मेळाव्यात ब्लॉक पिस्टन,बेरिंग,लाईट,हॉर्न कंट्रोल केबल सह फायबर आँईल वॲटम चे स्टॉल मांडण्यात आले होते.यावेळी दुचाकींमध्ये वर्षानुवर्षे बदलत चाललेली आधुनिक टेक्नॉलॉजी आणि त्यामुळे पर्यावरणावर होणार परिणाम या विषयांवर मान्यवरांनी मेकॅनिक्सना मार्गदर्शन केले. तर येणाऱ्या काळात पर्यावरण पूरक टेक्नॉलॉजी टू व्हीलर मध्ये विकसित कशा पद्धतीने करता येईल यावर भर द्यावा असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमास टू व्हिलर मेकॅनिक एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल सरनाईक, उपाध्यक्ष निशिकांत अंबरे, सेक्रेटरी सुमित पलुस्कर,न्यू कॉलेजचे विनय पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *