कोल्हापूरची स्वाभिमानी जनता प्रा.संजय मंडलिक यांच्या पाठीशी : आमदार राजेश क्षीरसागर

उद्यमनगर -यादवनगर परिसरात प्रा. मंडलिक यांच्या प्रचारार्थ फेरी
कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूरचा खासदार कोल्हापूरचा व्हावा.असे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. शिवसेनाप्रमुख आणि करवीर वासियांचे ऋणानुबंध इतके मजबूत होते कि, खुद्द शिवसेनाप्रमुख त्यांच्या दौऱ्यांचा शुभारंभ कोल्हापुरातूनच करत होते. राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर नगरीतल स्वाभिमानी जनता कधीच अमिषाला बळी पडली नसून, स्वाभिमानी जनता प्रा. संजय मांडलिक यांच्या पाठीशी ठाम असल्याचे प्रतिपादन आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. शिवसेना भाजप रिपाई रासप युतीचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ शिवाजी उद्यमनगर, यादवनगर परिसरात आयोजित प्रचार फेरी प्रसंगी ते बोलत होते.
आज सकाळी प्रचार फेरीची सुरवात बालावधुत तरून मंडळ, शिवाजी उद्यमनगर येथून आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केली. यावेळी “जय भवानी जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद” अशा घोषणा देत प्रचार फेरी परिसर दणाणून सोडला. यासह प्रा.संजय मंडलिक यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. पुढे ही प्रचार फेरी पुढे बालावाधुत तरुण मंडळ – यादवनगर चौक – डोंबार वाडा मेन रोड – के.आर.टी. व्ही.एस. शोरूम येथे येवून समाप्त करण्यात आली.
यावेळी बोलतना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूरची जनता हि स्वाभिमानी आहे. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागे ती ठाम उभी असते. माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला कामाची पोहच पावती करवीरवासियांनी दिली आहे. प्रा. संजय मंडलिक यांनी गेल्या २० वर्षात केलेल्या कामांची यादी पाहिली तर नक्कीच ते इतर उमेदवारांपेक्षा कितीतरी सरस असल्याचे दिसून येते. कोल्हापुरातील निवडणुकीचा रंग बदलण्याचा डाव विरोधकांकडून चालला असून, मतदारांना आमिषे दाखवून भुलविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा भ्रष्टवाद्यांचा डाव कोल्हापूरची स्वाभिमानी जनता नक्कीच हाणून पाडेल. कोल्हापूरची जनता युती शासनास पाठबळ देवून गल्ली ते दिल्ली पर्यंत भगवा फडकविण्यासाठी महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना प्रचंड बहुमताने विजयी करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या प्रचार फेरी प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, उपशहरप्रमुख दीपक चव्हाण, शिवसेना विभागप्रमुख अश्विन शेळके, शशिकांत रजपूत, दादू शिंदे, मंदार तपकिरे, टिंकू देशपांडे, नियाज पठाण, आसिफ मुल्लांनी, दिनेश साळोखे, विशाल देशपांडे, आदी शिवसेना भाजप युतीचे पदाधिकारी व भागातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *