कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या निवडणूकीची चुरस वाढली:अध्यक्षपदासाठी ४, उपाध्यक्षपदासाठी ४, तर संचालकपदासाठी २० उमेदवार निवडणूक रिंगणात

कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूरात दिं.२३ जून रोजी होणाऱ्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या निवडणुकीची
आज अर्ज छाननीनंतर चुरस वाढली.यामध्ये अध्यक्षपदासाठी ४, उपाध्यक्षपदासाठी ४, तर संचालकपदासाठी २० उमेदवार असे छाननीनंतर एकूण २८ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिल्याची माहिती निवडणूक अधिकारी कांतिलाल गुलाबचंद यांनी दिली. दरम्यान, य मंगळवार दिं १८जून रोजी माघारीनंतरच चित्र स्पष्ट होईल
सराफ संघाच्या इमारतीमध्ये आज निवडणूक समितीचे पदाधिकारी बिपीन परमार, उमेश जामसांडेकर, विजय वशीकर, जवाहर गांधी व हेमंत पावसकर यांच्या उपस्थितीमध्ये काल सायंकाळपर्यंत जमा झालेल्या अर्जांची छाननी करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदासाठी कुलदीप गायकवाड, विजय हावळ, रवींद्र खेडेकर, विजयकुमार भोसले असे चार, उपाध्यक्षपदासाठी किरण गांधी, राजेश राठोड, जितेंद्र राठोड, नरेंद्र राठोड असे चार, तर संचालक पदासाठी महेंद्र ओसवाल, प्रीतम ओसवाल, प्रसाद कालेकर, ललित गांधी, तेजस धडाम, किशोर परमार, सनी पोतदार, शीतल पोतदार, शिवराज पोवार, अनिल पोतदार, शिवराज पाटील, शिवाजी पाटील, अभिजित बकरे, रवींद्र राठोड, संजय चोडणकर, सुहास जाधव, नंदकुमार काकडे, संजय जैन, धर्मपाल जिरगे व शेखर वशीकर असे २० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.यावेळी
निवडणूक अधिकारी म्हणाले उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मंगळवार दिं१८जूनपर्यंत मुदत असून याचदिवशी सायंकाळी सात वाजता उमेदवारांची अंतिम यादी नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहे. तर रविवार दिं. 23 जून रोजी सकाळी आठ ते दुपारी दोनपर्यंत संस्थेमध्ये मतदान होऊन त्याच दिवशी दुपारी तीननंतर मतमोजणी होणार आहे. दुसरीकडे सर्वच उमेदवारांनी आपापल्या परीने प्रचार सुरू केला असून सकाळी आणि सायंकाळी अशा दोन सत्रामध्ये प्रत्येक दुकानात जाऊन सराफ व्यावसायिक प्रचार करीत आहेत. प्रचारासाठी स्वतः, मित्रपरिवार आणि इतर संस्थांशी असलेल्या नातेसंबंधाचा वापर करून, जरा आमच्या उमेदवाराकडे लक्ष द्या अशी ही विनंती केली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सराफ संघाच्या या निवडणूकीची चुरस वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!