कोल्हापूरात आरएसएसतर्फे पूरग्रस्त निवारण व मदत केंद्र सुरू

कोल्हापूर /प्रतिनिधी
पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे उदभवलेल्या आस्मानी संकटात बाधित झालेल्या लोकांकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , जनकल्याण समिती तर्फे मदत व निवारण केंद्र प्रायव्हेट हायस्कुल, खासबाग , कोल्हापूर येथे सुरू करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी या मुख्य केंद्रातून मदत व निवारण करण्यात येत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , जनकल्याण समिती तर्फे जिल्ह्यात ११० केंद्र सुरू करण्यात आले असून त्या ठिकाणी अन्य धान्य , वैद्यकीय सेवा , पाण्याचे व्यवस्थापन आणि कपड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच २६ केंद्रावरती मेडिक्लॉर चा वापर करून पाणी पुरवठा करण्यात येत आहे तसेच २६ पूरग्रस्त निवारा केंद्रावर म्हणजेच कोल्हापूर शहर, करवीर, शिरोळ, चंदगड या ठिकाणी वैद्यकीय केंद्र सुरू करण्यात आले आहे. या मध्ये २५ डॉक्टर आणि २५ मेडिकल प्रतिनिधींचा समूह सेवा देत आहे. सद्यस्थितीला ५ लाख रुपयांहून अधिक मेडिकल साहित्य व औषधे दान स्वरूपात गोळा झाली आहेत, गेल्या चार दिवसांमध्ये नऊहजारहुन अधिक लोकांची तपासणी करण्यात आली असून गरजे नुसार औषधोपचार करण्यात येत आहे. या कार्यासाठी आर्थिक मदत करू इच्छिणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , जनकल्याण समिती या नावे धनादेश किंवा रोख स्वरूपात मदत करू शकता. या कार्यासाठी श्री. भगतरामजी छाबडा ,डॉ. सूर्यकिरण वाघ, डॉ. राजेश पवार ,श्री. केदार प्र. जोशी,श्री. राहुल भोसले ,श्री. अनिरुद्ध कोल्हापुरे ,डॉ. मिलिंद सामानगडकर श्री केशव गोवेकर, श्री . मिलिंद कुलकर्णी या सह 1150 स्वयंसेवक या कार्यात सहभागी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *