कोल्हापूरात रोटरी क्लब आँफ गार्गीज व आर.एल.तावडे फौंडेशन तर्फे २१ जूनला अवयव दान जनजागृती रॅलीचे आयोजन:अवयवदान कुटुंबींयाचा होणार सत्कार

कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूरात रोटरी क्लब आँफ गार्गीज आणि आर.एल.तावडे फौंडेशनच्या वतीने समाजामध्ये अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी दिं.२१ जून रोजी सायंकाळी ४वा. दसरा चौक ते कावळा नाका मार्गावर देहदान- अवयवदान म्हणजे श्रेष्ठदान जनजागृती रँलीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यातील अवयवदान केलेल्या कुंटुबीयांचा आर.एल.तावडे फौंडेशन व रोटरी क्लब यांच्या वतीने डॉ. विभावरी भु.तावडे (जाधव) यांच्या स्मरणार्थ मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी दौलत देसाई व श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे अशी माहिती रोटरी क्लब गार्गीजच्या अध्यक्षा सुजाता लोहिया आणि आर. एल. तावडे फौंडेशनच्या सचिव शोभा तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अवयदान हे श्रेष्ठदान असून समाजामध्ये या विषयी जनजागृती होणे गरजेचं आहे. त्यामुळे डॉ. विभावरी तावडे यांच्या स्मरणार्थ अवयवदान विषयावर जनजागृती रॅली तसेच अवयवदान करणार्‍या कुटुंबीयांचा सत्कार अशी सामाजिक मोहीम राबविण्यात येणार असून या मोहिमेसाठी कायमस्वरूपी समिती तयार करण्यात येणार आहे.त्याची सुरुवात दिं.२१जूनला कोल्हापूरात करण्यात येणार असून आर.एल.तावडे फौंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ गार्गीज व कोल्हापुरातील इतर बारा रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दिं.२१ जून रोजी सायंकाळी ४ वा. दसरा चौक ते कावळा नाका या मार्गावर देहदान व अवयवदान हेच श्रष्ठदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यातील अवयवदान आणि देहदान केलेल्या कुटुंबींयाचा आर.एल.तावडे फौंडेशन व रोटरी क्लब यांच्या वतीने मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.तर या कार्यक्रमास जिल्हाधिकारी दौलत देसाई व श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. समाजामध्ये रक्तदान शिबिरे मोठ्या प्रमाणात होतात. परंतु अवयवदान करून एखाद्याचे आयुष्य वाढवणे.आणि मृत्युनंतर व जिवंतपणे कोणाचे तरी आयुष्य सुखकर करुन एखाद्याच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करण्याचे भाग्य लागते. त्यामुळे या मोहीमेसाठी आर.एल. तावडे फौंडेशन व रोटरी क्लब यांच्यावतीने पाच व्यक्तींची कायमस्वरूपी समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती अवयवदानाविषयी सदैव कार्यरत राहील असा विश्वास या वेळी सुजाता लोहिया ,शोभा तावडे आणि कविता घाडगे यांनी व्यक्त केला.
पत्रकार परिषदेला किशोर तावडे,
डॉ. नीता नरके, सुजय तावडे,विशाखा आपटे,कविता घाडगे उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!