कोल्हापूरात राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

कोल्हापूर/प्रतिनिधी
अच्छे दिनाचे सोप्ने दाखवणाऱ्या भाजप सरकारने सत्तेवर येऊन सर्वसामान्य जनतेसह युवकांच्या तोडांला पाने पुसण्याचे काम केले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रात बेरोजगारी, गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली असून नोटाबंदी,जीएसटी मुळे सर्व उद्योग व्यवसायात मंदी आली. तर लहान उद्योग,व्यवसाय डबघाईला आल्याने त्यामधील कामगार देशोधडीला लागले. तसेच अनेक लोक बेकारीच्या खाईत लोटले गेले. त्यामुळे भाजप सरकाराच्या चुकीच्या धोरणामुळे युवकांच्यात प्रचंड असंतोष पसरला आहे.याच्या निषेधार्थ भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.दरम्यान मोर्चाचे रूपांतर सभेत होऊन विविध मान्यवरांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा पाडाच वाचला. सदर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे नोटाबंदी नंतर दोन वर्षात सव्वा कोटी लोक बेरोजगार झाले. नवे रोजगार तयार करण्यात सरकारला पूर्णपणे अपयश आले. युवकांना दोन कोटी रोजगार देऊ,अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी भाजपचे सरकार केंद्रात सत्तेवर येण्यापूर्वी केली होती.मात्र सरकारने अपयश मान्य करून बेरोजगारी संदर्भात उपाययोजना न करता खोटी आकडेवारी जनतेच्या तोंडावर फेकायला सुरुवात केली.प्रत्येक वर्षी बेरोजगारांच्या हाताला काम देऊन नोकऱ्या देऊ अशी सरकारने घोषणा केली होती मात्र एकही रोजगार उपलब्ध झाला नाही.तसेच जीएसटी आणि नोटबंदीमुळे उद्योग-व्यवसायात मंदी आली असून गृहनिर्माण क्षेत्रात मोट्या प्रमाणात पीछेहाट झाली आहे.शिक्षण घेऊनही हाताला रोजगार नसल्याने हताश झालेल्या तरुण गुन्हेगारीकडे वळत आहे. सरकारने साडेचार वर्षात पोकळ आश्वासनाची खैरात करून सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली आहे. याचा जाहीर निषेध व्यक्त करुन महाराष्ट्रात चुकीच्या धोरणामुळे वाढत असलेले गुन्हेगारी,आत्महत्येचे उत्तर सरकारने द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनात महापौर सरिता मोरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ए.वाय.पाटील, शहराध्यक्ष आर.के.पोवार,राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोहित पाटील,महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्ष संगीता खाडे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष महेंद्र चव्हाण,कल्पेश चौगुले,प्रसाद उगवे,अनिल साळोखे,किसन कल्याणकर ,आदिल फरास यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!