कोल्हापूर महानगरपालिका वतीने जागतिक क्षयरोग सप्ताहास सुरुवात

कोल्हापूर : दर वर्षी प्रमाणे 24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हाणून साजरा केला जातो. या निमित्त क्षयरोग नियंत्रण सोसायटी को.म.न.पा. यांचे वतिने क्षयरोग जनजागृती सप्ताह दि. 22 ते 28 मार्च 2019 याकालावधीत साजरा करणेत येणार आहे. या सप्ताहाची सुरवात प्लॅशमॉब या नाविन्यपुर्ण उपक्रमाणे महानगरपालिकेच्या विठ्ठल रामजी चौक येथुन करणेत आली. याकार्यक्रमास सुप्रसिध्द अभिनेते हार्दिक जोशी (राणा) उपस्थित होते. यावेळी महानगरपालिकचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपआयुक्त मंगेश शिंदे, आरोग्यधिकारी डाँ.दिलीप पाटील, शहर क्षयरोग अधिकारी डॉ.अरुण परितेकर, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी उपस्थित होते. आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बोलताना सन 2025 पर्यत क्षयरोग उच्चाटन करावयाचे झालेस नागरिकांनी जनजागृती मोहिमेस सहकार्य करणेचे आवाहन करुन शहर क्षयरोग अधिकारी डाँ. अरुण परितेकर यांच्या कामकाजाचे विशेष कौतुक केले. अभिनेते हार्दिक जोशी (राणा) यांनी बोलताना सामान्य नागरिकांनी शासनाकडून राबविणेत येत असलेल्या विविध उपक्रमानमध्ये सहभाग घेतले शिवाय क्षयरोग उच्चाटन होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी क्षयरोग उच्चाटनास हातभार लावावा असे आवाहन केले तसेच शहर क्षयरोग कार्यालयाचेवतिने राबविणेत येत असलेल्या क्षयरोग जनजागृती माहिमेबाबत समाधान व्यक्त केले.उपआयुक्त मंगेश शिंदे, आरोग्यधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी डाँ.दिनकराव शिंदे समाजकार्य महाविद्यालयाचे प्रशिक्षणाथीर् विद्यार्थ्यानी क्षयरोग जनजागृतीपर प्लॅशमॉबचे मान्यवरांसमोर सादरीकरण केले. याउपक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक डाँ.एस.एस.आपटे यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ.योगिनी कुलकर्णी, क्षयरोग कार्यालयाकडील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *