कोल्हापूरात मराठा महासंघातर्फे १४ जून रोजी शहर मेळाव्याचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शहर शाखेचा पदाधिकारी, शाखाध्यक्ष व कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवार दिं.१४जून रोजी सायंकाळी ५ वा. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास राष्ट्रीय संयुक्त चिटणीस दिलीप दादा जगताप व जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक उपस्थित राहणार असून यावेळी ज्येष्ठ सभासद अमृतमहोत्सवी सत्कार नवीन पदाधिकारी निवडीत सभासद नोंदणी अभियान, शैक्षणिक आरक्षण या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे .तरी या मेळाव्यास कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शहर कार्याध्यक्ष उत्तम जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!