कोल्हापूरात माणगाव परिषद शताब्दी महोत्सव समितीतर्फे ३० सप्टेंबरला प्रा.विनय कांबळे यांचे व्याख्यान

कोल्हापूर /प्रतिनिधी :कोल्हापूरात माणगाव परिषद शताब्दी महोत्सव समितीच्या वतीने माणगाव परिषदेच्या शताब्दी महोत्सव आणि झुंजार पँथर नेते राजा ढाले यांच्या जन्मदिनानिमित्त दिं.३० सप्टेंबर रोजी समितीचे अध्यक्ष प्रा.विनय कांबळे यांचे शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी ५.३०वा.”आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळीचे झुंझार नेते राजा ढाले “या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल आहे .अशी माहिती समितीचे अध्यक्ष प्रा.विनय कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माणगाव परिषद शताब्दी महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे मंथन करण्यासाठी वर्षभर विविध विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान त्याच अनुषंगाने झुंजार पँथर नेते राजा ढाले यांच्या कार्याविषयी नवी पिढीला माहिती व्हावी यासाठी दिं.३० सप्टेंबर रोजी शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी ५.३०वा.समितीचे अध्यक्ष प्रा.विनय कांबळे यांच्या “आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळीचे झुंझार नेते राजा ढाले “या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ अभ्यासक डॉ. हरिष भालेराव असणार आहेत.तरी या व्याख्यानाचा लाभ समाजातील सर्वांनी घ्यावा असे आवाहन या वेळी समितीच्या वतीने करण्यात आले.
पत्रकार परिषदेला समितीचे उपाध्यक्ष प्रा.ए.बी.कांबळे, कोषाध्यक्ष प्रा.अशोक चोकाककर, राहूल ठाणेकर यांच्या सह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!