कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून जनतेच्या विश्वासाने प्रचंड मताधिक्यांनी विजयी होईल:अपक्ष उमेदवार बाजीराव नाईक यांचा विश्वास

कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर च्या विकासासाठी मी कटिबद्ध असून निवडून आल्यानंतर कोल्हापूर चे सर्व प्रश्न मार्गी लावण्यास माझा प्रामाणिक प्रथम प्रयत्न असणार आहे. तर कोल्हापूर च्या जनतेवर माझा विश्वास असून याच जनतेच्या विश्वासाने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून प्रंचड मतानी विजयी होईल असा विश्वास कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार बाजीराव नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मातंग आरक्षण वर्गीकरण लढ्याचे अग्रणी लढाऊ नेते बाजीराव नाईक यांना आज सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याचे जेष्ठ नेते शंकर भाऊ तडाखे आणि सकल मातंग समाजासह विविध संघटनेच्या वतीने आज कोल्हापूरात पत्रकार परिषद घेऊन जाहीर पाठिंबा देण्यात आला.
दिं.२३एप्रिल रोजी होणाऱ्या कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात बाजीराव नाईक अपक्ष निवडणूक लढवत आहे.यावेळी रणरागिणी महिला मंडळ महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सौ.निशाताई मधूकर रसाळ आणि लहुजी संघर्ष सेना प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण तांदळे ,लोकजन शक्ती पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र संघटक विलास जयवंत कांबळे व बेरड रामोशी संघटना अध्यक्ष शिवाजीराव नाईक ,महाराष्ट्र राज्य सर्व धर्म संघटना संस्थापक अध्यक्ष मारुती माने यांच्या सह विविध समाजातील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवार बाजीराव नाईक यांना पाठिंबा जाहीर केल्याच सांगितल.
पत्रकार परिषदेला लहुजी शक्ती सेना, लहुजी संघर्ष सेना, रणरागिणी महिला मंडळ, डवरी समाज ,लोकजन पार्टी आदी संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *