कोल्हापूरात कोल्हापूर खाटीक समाज कोल्हापूर तर्फे १७ एप्रिलला मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूरात नवीन स्थापन झालेल्या कोल्हापूर खाटीक समाज कोल्हापूर या संस्थेच्या वतीने खाटीक समाजासाठी पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच बुधवार दिं.१७ एप्रिल रोजी आयर्वीन मल्टीपर्पज हाँल येथे मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल आहे. दरम्यान यानिमित्ताने भव्य राज्यस्तरीय हिंदू खाटीक वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन ही करण्यात आल आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संतोष उर्फ शितल प्रभावळकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पश्चिम महाराष्ट्रात खाटीक समाजाच्या सामुदायिक विवाह सोहळ्यास फारसा प्रतिसाद मिळत नसून अशा कार्यक्रमात विवाह करणे लोकांना कमीपणाचे वाटते. त्यामुळे खाटीक समाजातील लोकांनी अशा सामुदायिक विवाह सोहळ्याकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलावा तसेच परिस्थिती नसताना ही विवाहासाठी होणारा खर्च कुंटुबांनी टाळावा यासाठी कोल्हापूर खाटीक समाज कोल्हापूर या संस्थेचा प्रयत्न असून या मध्ये अंदाजे दीड ते दोन हजार खाटीक समाज बांधव सहभागी होतील अशी अपेक्षा यावेळी संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. बुधवार दिं.१७एप्रिल रोजी होणाऱ्या मोफत सामुदायिक विवाह कार्यक्रमाचा शुभारंभ सकाळी १०वा. उद्योगपती विठ्ठल थोरपे(पुणे) यांच्या हस्ते तर शिवाजी विद्यापीठ उपकुलसचिव चंद्रकांत कोतमिरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्यांना मणी मंगल सुत्र व प्रापंचिक साहित्य देण्यात येणार असून हा सामुदायिक विवाह सोहळा ३.३०ते६ या शुभमुहूर्तावर होणार आहे. दरम्यान भव्य राज्यस्तरीय हिंदू खाटीक वधू-वर पालक परिचय मेळावा, महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आल असून स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या खाटीक समाजातील विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे समाजातील वीरमाता, वीरपीता,वीरपत्नी तसेच जवानांचा सन्मान करण्यात येणार आहे.तरी खाटीक समाजासाठी आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त कार्यक्रमाचा लाभ खाटीक समाजातील बाधंवानी घ्यावा असे आवाहन कोल्हापूर खाटीक समाज कोल्हापूर संस्थेच्या वतीने यावेळी करण्यात आल.
पत्रकार परिषदेला संस्थेचे उपाध्यक्ष नितीन घोडके, सचिव सचिन घोटणे,मधुकर घोडके, शिवाजी नुलकर(कांबळे),रमेश मोरे,नरेंद्र प्रभावळकर यांच्या सह संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *