कोल्हापूरात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त २२मे रोजी “हे मृत्युंजय”नाटकाचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूरात स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य व विज्ञान मंडळ आणि सावरकर राष्ट्रीय स्मारक मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवार दिं.२२मे रोजी सायंकाळी ७.३०वा.केशवराव भोसले नाट्यगृहात कोण जिंकणार ?”मृत्यू की सावरकर?,”हे मृत्युंजय”नाटकाचा प्रयोग होणार आहे. सदर नाटकासाठी स्वेच्छा मुल्य आकारण्यात येणार असून या नाटकाचा लाभ जिल्ह्यातील सावरकरप्रेमी सह तरुणांनी घ्यावा असे आवाहन सावरकर प्रतिष्ठानचे सुनील वालावलकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य व विज्ञान मंडळाचे जिल्हा अध्यक्ष नितीन वाडीकर यांनी पत्रकार परिषदेत केलय.
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य व विज्ञान मंडळ कोल्हापूर या संस्थेला स्थापनहोऊन १३मे रोजी ६वर्ष पूर्ण झाले असून सावरकरांचे विचार ,त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन ,समाजामध्ये जातीभेद नष्ट करण्याचे त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहचवणे हा या संस्थेचा हेतू आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वातंत्रवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून “हे मृत्युंजय”या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात येणार आहे.अंदमान म्हणजे साक्षात मृत्यू!मृत्यूचं साम्राज्य असलेल्या अंदमानातला छळ आणि शिक्षा सहन करण्यापेक्षा आत्महत्या करण तिथे बंदिवासात असलेल्या क्रांतीकारकांना जास्त सोयीच वाटत असे.सावरकरांना सुद्धा याच कारागृहात डांबण्यात आल.तिथला जेलर क्रूरकर्मा डेव्हिड बँरी याने त्यांचाही अतोनात छळ करायचा प्रयत्न केला. मानसिक त्रास देऊन त्यांच मानसिक संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न केला. पण सावरकर या सगळ्याला पुरुन उरले. आणि तिथल्या मृत्यूला आव्हान देत मृत्युंजय बनले. मृत्यू आणि सावरकर यांच्या या अद्वितीय संघर्षाची कहाणी म्हणजे च “हे मृत्युंजय”!
मृत्यू आणि सावरकर यांच्या संवादातून हे नाटक उलगडत जात असून स्वातंत्र्यावीर सावरकर राष्ट्रीय स्मारक व अनामिका या नावाजलेल्या संस्थानी खास तरुणाईसाठी या या नाटकाची निर्मिती करण्यात आलीय.तर या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी तर कलर्स मराठी वरील सख्या रे मालिके मधील अजिंक्य ननावरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका निभावली आहे.तर तू माझा सांगाती- शार्दूल आपटे,तू अशी जवळी रहा – बिपीन सुर्वे या लोकप्रिय कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. अशा लोकप्रिय ठरलेल्या “हे मृत्युंजय”या नाटकाचे आज अखेर ६१ प्रयोग संपन्न झाले असून २२ मे पर्यंत ७० होतील असा विश्वास या वेळी आयोजकांडून व्यक्त करण्यात आलाय.तर या नाटकाच्या प्रवेशिकेसाठी महालक्ष्मी धर्मशाळा ताराबाई रोड – २६२६३७७ ,केशवराव भोसले नाट्यगृह मिलिंद अष्ठेकर ९८२२५५४७७० तसेच सेंट्रल लाँर्ड्री कावळा नाका राजेंद्र शिंदे – ९३७२४३०५२२ या नंबरवर संपर्क साधावा .असे आवाहन सावरकर प्रतिष्ठानचे सुनील वालावलकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य व विज्ञान मंडळाचे जिल्हा अध्यक्ष नितीन वाडीकर यांनी पत्रकार परिषदेत केलय.
पत्रकार परिषदेला श्रीरंग कुलकर्णी, शालिनी शेटे,राजेंद्र शिंदे, सुनील नाईक, विकास परांजपे, संजीव कुलकर्णी, तुळशीराम लटकन,राजू मेवेकरी,सुभाष पुरोहित, अर्पणा फडके,साईप्रसाद बेकनाळकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *