कोल्हापूर हायकर्स व नवकृषी फौडेशनतर्फे पुरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप

रूई/प्रतिनिधी
कोल्हापूर हायकर्स व नवकृषी फौडेशन यांच्या वतीने रूई येथील कन्या विद्यामंदीर शाळेतील पुरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी चे दर्शन घडवले.
कोल्हापूर, सांगली सह सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. या महापुरात अनेकांचे छत्र हरवले. तर अनेक लघुद्योगही विस्कळीत झाले. पुरग्रस्तांसाठी अनेक मदतीचे हात पुढे सरसावले आहेत. मदतीच्या यादीत कोल्हापूर हायकर्स व नवकृषी फौडेशन देखील सहभागी झाला आहे. रूई येथील कन्या विद्यामंदीर शाळेतील पुरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप केले.
कोल्हापूर हायकर्स व नवकृषी फौडेशन यांच्याकडून कन्या विद्यामंदीर शाळेतील १०० विद्यार्थ्यांना स्कुल बॅग्ज, कंपासपेटी अशा उपयोगी शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्याना इतर ही शालेय वस्तूंची मदत करण्यात येईल असे आश्वासनही देण्यात आले. यासोबत गावातील सुमारे ५० कुटुंबांना फुड पॅकेजेसही देण्यात आले.
याप्रसंगी कोल्हापूर हायकर्स व नवकृषी फौडेशन, ग्रुपचे सागर पाटील, वैशाली देसाई, शिवराज देसाई, मनिषा जोशी, तेजस्विनी मोहिते, कमलेश भोसले, धैर्यशील हजारे, वैष्णवी मानकामे, शीतल महामुनी, तेजश्री भस्मे, अमरसिंह शिंदे आदी सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!