कोल्हापूरात प्रथमच २८ते३०जून दरम्यान होणार मंडपांचे प्रदर्शन:विभागीय अध्यक्ष सागर चव्हाण

कोल्हापूर/प्रतिनिधी:- पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच कोल्हापूरात कोल्हापूर जिल्हा मंडप लाईंटिंग डेकोरेशन असोसिएशन (पश्चिम महाराष्ट्र झोन)यांच्या वतीने तर आँल महाराष्ट्र टेंट डिलर्स वेलफेअर आँर्गनाइझेशन यांच्या सहकार्यातून राम-कृष्ण हाँल मार्केट यार्ड येथे दिं.२८ ते ३० जून या दरम्यान तीनदिवसीय मंडप प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल आहे.तर या प्रदर्शनाचे उद्घाटन दिं.२८जून रोजी सकाळी ११वा.श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी आमदार सतेज पाटील असणार आहेत.यानिमित्त तीन दिवस विविध सामाजिक, सांस्कृतिक, व्यावसायिक कार्यक्रम होणार असल्याच ऑल महाराष्ट्र टेंट डिलर्स वेलफेअर ऑर्गनायझेशनचे विभागीय अध्यक्ष सागर प्रल्हाद चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितल.
ते म्हणाले, कोल्हापूर जिल्हा मंडप लाईटिंग डेकोरेशन असोसिएशनच्या वतीने व ऑल महाराष्ट्र टेंट डिलर्स वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या सहयोगाने येथील रामकृष्ण लॉन येथे होणाऱ्या या प्रदर्शनात १०० स्टॉल आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील हजारो मंडप डेकोरेटर्स व्यावसायिकांना विशिष्ट चाकोरीमधून बाहेर पडून आपला व्यवसाय वाढविण्यासाठी या प्रदर्शनाचा लाभ होईल.
ते म्हणाले, प्रदर्शनामध्ये सुपर स्ट्रक्चर मंडप आणि डेकोरेशन साहित्य, फायबर साहित्य, फुलांचे तयार डेकोरेशन, कापड, खुर्ची, कर्टन्स, टेबल कव्हर्स, कनात, गालीचे, कारपेट, लाईट डेकोरेशन, स्टेज सेट, चवरी मंडप आणि डेकोरेशन व्यवसायाशी संबंधित देशभरातील साहित्य उत्पादक, विक्रेते सहभागी होणार आहेत. मंडप डेकोरेशनसाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी पाहण्याची व खरेदी करण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे.
सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत होणाऱ्या या प्रदर्शनाचे २८ जूनला सकाळी ११ वाजता श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते उदघाटन होईल, तर अध्यक्षस्थानी आमदार सतेज पाटील असतील. यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण उपस्थित राहतील. दुपारी ४ वाजता व्यावसायिक मार्गदर्शन, चर्चासत्राबरोबर ऑल महाराष्ट्र टेंट डिलर्स वेलफेअर ऑर्गनायझेशनची बैठक आयोजित केली आहे. यावेळी ऑल इंडिया टेंट डिलर्स वेलफेअर ऑर्गनायझेशनचे कर्तारसिंग कोचर व महाराष्ट्रचे अध्यक्ष दडू पुरोहित उपस्थित राहणार आहेत. रात्री ८ वाजता संगीतसंध्या होईल. २९ जूनला सायंकाळी ४ वाजता जीएसटीविषयी चर्चासत्र होईल, तर समारोपाला (३० जून) सायंकाळी ७.३० वाजता फक्त निमंत्रितांसाठी महाराजा बॅन्क्वेट हॉल येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कोल्हापूरबरोबरच सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील जवळपास तीन हजार मंडप व्यावसायिकांची उपस्थिती यावेळी राहील, असेही चव्हाण यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला प्रणय तेली (सिंधुदुर्ग), अमरिश सावंत (रत्नागिरी), मोहन करपे (सातारा), शिवकुमार पाटील (सोलापूर), अनिल काटे यांच्यासह कोल्हापूर जिल्हा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!