कोल्हापूरात वीज दरवाढी विरोधात हजारो शेतकरी रस्त्यावर

कोल्हापूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी दिलेल्या वीज बिलांची दुरुस्ती करण्याच्या लेखी आश्वासनाची आज अखेर अंमलबजावणी केलेली नाही.तर महावितरण कंपनीने कृषी-औद्योगिक घरगुती वाणिज्य ग्राहकांच्या विजेच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ केल्याच्या विरोधात जेष्ठ नेते प्रा.एन डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला.सदर मागणीचे निवेदन महावितरणचे मुख्य अभियंता अनिल भोसले यांना देण्यात आले.
दरम्यान आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या मुख्यमंत्र्यांसह महासूल मंत्री चंद्रकांत पाटलांच्या गाड्या अडवून जाब विचारणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.तर प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या ९ ऑगस्ट पूर्वी मान्य न झाल्यास, ९ ऑगस्टच्या क्रांती दिनी, पुणे –बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा यावेळी सर्वपक्षीयांनी दिला.
महावितरणच्या शेतकरी विरोधी धोरणा विरोधात जेष्ठ नेते प्राध्यापक एन.डी.पाटील, आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौकातून या मोर्चाला सुरवात झाली. बसंत-बहार रोड, जिल्हाधिकारी कार्यालया मार्गे हा मोर्चा महावितरण कार्यालयावर आला. यावेळी याठिकाणी जाहीर सभा घेण्यात आली. महावितरण आणि सरकारच्या चुकीच्या कारभारावर यावेळी टीकेची झोड उठविण्यात आली. जेष्ठ नेते प्राध्यापक एन डी पाटील यांनी,शेतकऱ्याच्या स्वाभिमानाला डिवचू नका, त्यांना फसवाल तर याद राखा असा इशारा दिला. चुकीची वीज बील दुरुस्ती करण्याची मागणी गेली अनेक वर्ष करण्यात येत आहे. मात्र प्रत्येक वेळी आश्वासन देवून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत असल्याचही त्यांनी सांगितल. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून एकहि आश्वासन पाळल गेलेलं नाही. २१ जानेवारी रोजी करण्यात आलेल्या चक्का जाम आंदोलनावेळी मुख्यमंत्र्यांची सही असलेलं पत्र देण्यात आल. मात्र त्या आश्वासनांची पूर्णता अद्यापहि झालेली नाही. सत्तेत असलेले मुख्यमंत्री एक बोलतात, तर त्यांच्या मंत्री मंडळातीलमंत्री एक बोलतात. त्यामुळ या मंत्र्यांना जाग आणण्यासाठीप्रसंगी मंत्रालयाला घेराव घालू असा इशाराहि प्राध्यापक एन.डी.पाटील यांनी यावेळी दिला. माजी खासदार राजू शेट्टीयांनी 20 मार्च 2019 पर्यत कृषी पंपाच्या विजेचा दर 1 रु16 पैसे असा स्थिर ठेवण्याचं आश्वासन सरकारन दिल होत. मात्र वीज दरात वाढ करून सरकारन शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळ आता आर या पारची लढाई करण्याची गरज असून, जो पर्यंत सरकार नमत नाही तो पर्यंत रस्त्यावरची लढाई सुरु ठेवण्याचं आवाहन माजी खासदार शेट्टी यांनी केल. जी वीज वापरली नाही ती बिलशेतकऱ्यांच्या माथी लादली जात आहेत. वीज गळती आणि यांची खळगी भरण्यासाठीचं हा सर्व खटाटोप सुरु असल्याचा आरोपहि माजी खासदार शेट्टी यांनी केला. शिवाय, २१ जानेवारी रोजी झालेल्या चक्का जाम आंदोलन वेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, मध्यस्ती करून मागण्यांची पूर्तता करण्याच आश्वासन दिल होत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सही असलेलं लेखी पत्र देखील देण्यात आल होत. मात्र गेली सहा महिने झाले मागण्यांची पूर्तता झालेली नाही त्यामुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याचा जाब विचारू. तसेच ९ ऑगस्ट पूर्वी सरकारन मागण्या मान्य न केल्यास, ९ ऑगस्टच्या क्रांती दिनी, पुणे –बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
मोर्चात युवा नेते ऋतुराज पाटील, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भगवान काटे, करवीर पंचायत समितीचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी, बाबासो पाटील-भूयेकर, महादेव तांबे, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य यांच्यासह जिल्ह्यातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!