कोल्हापूरात एकता बहुद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे स्वरगंध म्युझिकल मंचचा १९ मे रोजी सदाबहार गींताचा नजराणा:कार्यक्रमातून मिळणारा निधी अंध,दिंव्याग व्यक्तीसाठी मदत म्हणून करणार सुपूर्त

कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूरात एकता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने स्वरगंध म्युझिकल मंच चा रविवार दिं.१९ मे रोजी सायंकाळी ५वा.राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सदाबहार गीतांचा नजराणा सादर करण्यात येणार असून या कार्यक्रमातून मिळणारा निधी अंध,दिंव्याग व्यक्तीसाठी मदत म्हणून सुपूर्त करण्यात येणार असल्याची माहिती एकता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा जबीन शेख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
समाज म्हणजे काय तर एकमेकांना साथ दिली पाहिजे. तरच समाज म्हणण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आज समाजातील दु:ख आपण पूर्णपणे कमी करू शकलो नसलो तर काही जणावरील दुखाचा भार कमी करु शकतो.यातच माणुसकीचा खरा धर्म आहे. याच भावनेने एकता बहुउद्देशीय सामाजिक संस्था कार्यरत असून समाजातील दिंव्याग,अंध व्यक्तींना मदत करुन समाजाशी त्यांचे नाते अधिक घट करण्यासाठी रविवार दिं.१९मे रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी ५वा.स्वरगंध म्युझिकल मंच चा सदाबहार गींताचा नजराणा सादर करण्यात येणार आहे. तर या कार्यक्रमासाठी ऐच्छिक प्रवेश शुल्क असून या कार्यक्रमातून मिळणारा निधी समाजातील अंध,दिंव्याग व्यक्तींसाठी मदत म्हणून सुपूर्त करण्यात येणार आहे. या सदाबहार गीतांच्या कार्यक्रमात कराओके ट्रँक शो,दिल दे दिया है..जाँ तूम्हे देंगे… अशा गींताचा कार्यक्रम सादर होणार आहे. तरी सामाजिक कार्यास हातभार लावणाऱ्या सदाबहार गीतांच्या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन यावेळी एकता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्षा जबीन शेख यांनी केलय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *