कोल्हापूर जिल्हा टु व्हिलर मेकॅनिक्स असोसिएशनतर्फे जोतिबा यात्रेनिमित्त नादुरुस्त दुचाकी वाहनांच्या दुरुस्तीसह पंक्चर काढण्याची मोफत सेवा

कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात श्री क्षेत्र जोतिबा यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी होत असते.तर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राबरोबर इतर जिल्ह्यातून भाविकांची जोतिबा यात्रेला मांदियाळी असते.दरम्यान कोल्हापूर जिल्हा टु व्हिलर मेकँनिक्स असोसिएशनच्या वतीने गेली १८वर्षे झाली (सन २०००पासून) श्री जोतिबा यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या दुचाकी वाहनांची मोफत दुरुस्ती आणि पंक्चर काढणे हा राबविण्यात येणारा सामाजिक उपक्रम यंदा ही तेवढ्या जोमात राबविण्यात येणार आहे. या सेवेची सुरुवात बुधवार दिं.१७ पासून सुरू करण्यात येणार असून यात्रा संपेपर्यंत राहणार आहे. तर यावर्षी दुचाकी दुरुस्ती मोफत सेवेत एक विशेष नवा उपक्रम म्हणून मेकँनिक बंधूंच्या गृहीणींचा ही सहभाग असणार आहे. या सेवेचा शुभारंभ महिलांच्याच हस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती संजय पाटणकर आणि नाना गवळी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
ही सेवा यात्री निवास येथील दुचाकी पार्किंग, यमाई मंदिर, नवीन दुचाकी पार्किंग स्थळ आदी ठिकाणी होणार असून घाटामध्ये ८ते१० अशा विविध ठिकाणी सेवा कक्ष उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर भाविकांना जागेवर सेवा देण्यासाठी ठिकठिकाणी घाटामध्ये संपर्क नंबर असणारे बोर्ड लावण्यात येणार आहेत .तर ही सेवा पार पाडण्यासाठी कोल्हापूर जिल्हा दुचाकी मेकँनिक्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोष हराळे,सेवा कमिटी प्रमुख संजय पाटणकर ,नाना गवळी,माधव सांवत, बबन सावंत, रवि कांडेकर यांच्या सह जिल्ह्यातील ८०ते१००मेकँनिक् बांधव या सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. तर रवि कांडेकर यांनी नादुरुस्त दुचाकीचे पंक्चर काढण्यात येणाऱ्या(एमऐटी) दुचाकीची निर्मिती केलेली आहे.
पत्रकार परिषदेला माधव सावंत, बबन सावंत, रवि कांडेकरी वैभव पाटणकर, विलास दळवी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *