कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना विविध मागण्यांचे लेखी निवेदन

कोल्हापूर : पत्रकारांच्या विविध मागण्यांचे लेखी निवेदन मराठी पत्रकार परिषद संलग्न कोल्हापूर डिस्ट्रीक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले.
मराठी पत्रकार परिषदेचे कोल्हापूर महानगर अध्यक्ष ताज मुलाणी व कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टस् वेल्फेअर असोसिएशचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे, उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील, खजानीस सदानंद कुलकर्णी, कौन्सील मेंबर प्रा. भास्कर चंदनशिवे, शशिकांत राज, सुरेश कांबरे, दयानंद लिपारे,जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश तिराळे, कोर कमिटी मेंबर आनंदा काशिद, भाऊसाहेब सकट, अरूण तळेकर, बाळासाहेब चोपडे, कृष्णात माळी, कागल तालुका अध्यक्ष महादेव कानकेकर, कार्याध्यक्ष सागर लोहार, सरदार काळे, तानाजी पाटील यांनी निवेदन देवून पत्रकाराच्या अडचणी स्पष्ट केल्या .
निवेदनात म्हटले आहे की, मराठी पत्रकार परिषद संलग्न कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशन ही संस्था राज्य पातळीवर काम करीत आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील पत्रकार न्याय व हक्कासाठी निर्भीडपणे लेखन करीत असतात, वृत्त संकलनाचे काम करणाऱ्या प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया मधील प्रतिनिधींना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे, वास्तव व वस्तुनिष्ठ बातम्या देत असताना निर्भिड लेखणीमुळे धमक्या व मारहानीच्या प्रसंगांनाही पत्रकारांना तोंड द्यावे लागते,.
अशा वेळी शासनाने पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी कडक कायदे केले पाहिजेत त्याशिवाय पत्रकारांना हौसिंग सोसायटीसाठी जागा उपलब्ध करून दयावी, एसटी पास तसेच प्रमुख मार्गावरील टोल फ्री पास मोफत मिळावेत , प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळावीत ,पत्रकारांच्या मुलांना शैक्षणिक व नोकरीत राखीव जागा देऊन वैद्यकीय सुविधांचा त्यांना लाभ मिळावा , सरसकट सर्व पत्रकारांना पेन्शन मिळावी अशा मागण्या या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत. लेखी निवेदन संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे, उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील यांच्या सह्याचे आहे.
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी सतीश पाटील, हरी बुवा, सलीम खतीब, विठ्ठल मोहिते, अवधूत मुसळे,सागर पाटील, सागर मोरे, श्रीकांत पाटील, एन.टी. कांबळे, संजय कांबळे, बाबासाहेब चिकोडे, फारूक मुल्ला, मनोज हगडे, अनिल पुजारी, अशोक ससे आदी उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *