कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा सेंट्रल किचन पद्धतीला विरोध

कोल्हापूर/प्रतिनिधी –
महिला बचत गटाकडील मध्यान्ह भोजनाची जबाबदारी काढून घेऊन सेंट्रल किचन पद्धतीची अंमलबजावणी करण्यास कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ विरोध करत आहे असा ठराव शैक्षणिक व्यासपीठ बैठकीत करण्यात आला .ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डी .बी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष एस.डी. लाड यांच्या अध्यक्षतेखाली हा ठराव करण्यात आला .
महाराष्ट्रातील शेकडो महिला बचत गटांना सध्या रोजगार उपलब्ध झाला आहे पण सेंट्रल किचन चालू केल्यास या महिला बचत गटावर खूप मोठा अन्याय होऊन बेरोजगारी वाढणार आहे . महिला बचत गटांनी चालू केलेल्या आंदोलनाला व्यासपीठातर्फे पाठिंबा देण्याचा निर्णय झाला .आजच्या सभेत पवित्र पोर्टल बाबत उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे याची माहिती देण्यात आली . कायम विना अनुदानित शाळांना पुढील अनुदानाची टप्पे मिळावेत यासाठी होणाऱ्या आंदोलनास ही पाठिंबा देण्यात आला. विविध शैक्षणिक समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी व्यासपीठाचे शिष्टमंडळ लवकरच शिक्षण उपसंचालक व माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना भेटणार आहे .
या बैठकीस डॉ. क्रांतीकुमार पाटील, आर. वाय. पाटील, व. ज. देशमुख, सुधाकर निर्मळे,बी.डी. पाटील, उदय पाटील, प्रा.सी.एम. गायकवाड, बी.जी. बोराडे, गजानन काटकर, आर.डी. पाटील, राजेश वरक, के.के. पाटील, भाऊसाहेब सकट, जी.ए. जाधव, अरूण मुजुमदार, बी.एस. कांबळे, संदीप पाटील, समीर घोरपडे, एम.व्ही. जाधव, बी, के. मोरे आदी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!