कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ व महाराष्ट्र राज्य शाळा कृतीसमितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन

कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने १ नोव्हेंबर २००५ च्या टप्पा अनुदानातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवार दिं.१५जून रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे कोल्हापूर जिल्हा शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ आणि महाराष्ट्र राज्य शाळा कृतीसमितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील यांनी सांगितले.
येत्या अधिवेशनात १ नोव्हेंबर २००५ च्या टप्पा अनुदानातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उद्या दिं.१५ जून रोजी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीसह विविध शिक्षक ,कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.तरी जुनी पेन्शन योजना हा आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न असून आपल्या व आपल्या कुटुंबाच्या भवितव्यासाठी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकुटुंब या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि महाराष्ट्र राज्य शाळा कृतीसमितीच्या वतीने करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक संघाचे सचिव दत्ता पाटील,महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे कोषाध्यक्ष एम.आर.पाटील,संचालक ए.एम.रणदिवे ,श्रीकांत पाटील ,पन्हाळा तालुका मुख्या.संघाचे अध्यक्ष एस.आर.पाटील,सचिव एच.आर.शिंदे ,पी.एस.पाटील,पी.जी.पाटील,नानासो पाटील,सुरेश संभाजी जाधव,सुरेश बाडे ,एस.व्ही.पाटील व यांच्या सह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *