कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी: भव्य मिरवणुक ठरले जयंतीचे मुख्य आकर्षण

कोल्हापूर/ प्रतिनिधी : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पारंपरिक तिथीप्रमाणे मोठ्या शिवमय वातावरणात “छत्रपती शिवाजी महाराज की जय”,जय भवानी-जय शिवाजी “च्या जयघोषात साजरी करण्यात आली.
शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन गेली आठवडाभर करण्यात आले होते. आज जयंतीचा मुख्य दिवस होता .आज संयुक्त रविवार पेठ तरुण मंडळ व मंगळवार पेठ तरुण मंडळ, राजारामपुरी उत्सव उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ शिवजयंती उत्सव यांच्यासह विविध तरुण मंडळे संस्था संघटनांच्या वतीने यांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत नृत्य खास आकर्षण होते. महापालिकेच्या वतीने परिसराची स्वच्छता व सजावट करण्यात आली होती विद्युत रोषणाई करून सर्व पुतळे सजविण्यात आले होते. पारंपरिक लवाजम्यासह साऊंड सिस्टिम लेझर शो ,इतर राज्यातील पारंपरिक कला पथके शिवकालीन युद्धकला स्थानिक कलाकारांचे संस्कृती कार्यक्रम यांनी मिरवणूक सजली होती. आणि आकर्षक शिवाजी मूर्ती असे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य होते. शहराबरोबरच उपनगरे आणि ग्रामीण भागातील शिवप्रेमींनी शिवजयंतीची तयारी करून आज ठिकठिकाणी शिवाजी महाराजांच्या मुर्तीची स्थापना केली होती भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या.
दिवसभर मंडळांच्या ठिकाणी पोवाडे लावण्यात आले होते काही ठिकाणी सुंटवड्याचे वाटप करण्यात करण्यात आले.हा सोहळा पारंपरिक पद्धतीने आनंदी उत्साही वातावरणात पार पडला मिरवणुकांमुळे रस्त्यांवर वाहनांची कोंडी झाली होती .यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *