कोल्हापूरात अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे ६ ऑगस्टला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूरात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मंगळवार दि.६ऑगस्ट रोजी सायंकाळी ५वा.राजर्षी शाहू स्मारक भवन येथे मान्यवरांच्या हस्ते
प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी दहावी मध्ये ९०% व बारावी मध्ये ८५% पेक्षा जास्त गुण प्राप्त करून विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिली. दरम्यान याप्रसंगी प्रातांधिकारी सचिन इथापे यांचे “भावी शैक्षणिक आव्हाने” या विषयावर व्याख्यान होणार असून प्रमुख पाहुणे प्राचार्य के.डी.पाटील,सी.ए. अनिल शिंदे, उद्योजक चंद्रकांत जाधव, क्रीडाईचे महेश यादव यांची उपस्थिती लाभणार आहे.तरी कार्यक्रमास सर्वांनी उपस्थिती लावली असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!