कोल्हापूरात अखिल भारतीय किसान सभेतर्फे १६जून रोजी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान शेतकरी परिषदेचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी
महाराष्ट्रातील देवस्थानच्या जमिनी इनाम वर्ग ३ खालसा करून कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या कराव्यात.तर राज्य सरकारने येत्या पावसाळी अधिवेशनात तसा कायदा मंजूर करावा या प्रमुख मागणीकडे राज्य सरकारच लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूरात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने रविवार दिं.१६ जून रोजी दु.१वा.राजर्षी शाहू स्मारक भवन येथे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आलयं.अशी अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ. उदय नारकर यांनी पत्रकार परिषदेत दिलीय.
महाराष्ट्रात विविध देवस्थानाची दैनंदिन पूजा अर्चा करण्यासाठी देवस्थान इनाम वर्ग तीन नुसार पिढ्यान पिढया शेतकरी जमीन कसत आहेत.तर देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने वारंवार सनदशीर मार्गाने आंदोलने सुरू आहेत. दरम्यान याबाबत राज्य सरकारने सकारात्मक भूमिका दाखवत तसा कायदा करण्यासाठी विधानसभेत विधेयक मांडण्याचे मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत लेखी आश्वासन दिल होतं.मात्र सरकारने दिलेल्या आश्वासन ला केराची टोपली दाखवल्याने पुन्हा सरकारला या प्रश्नाची आठवण करून देऊन तसा कायदा करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने राजर्षी शाहू स्मारक सभागृहात दिं.१६ जून रोजी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान शेतकरी परिषदच आयोजन करण्यात आल्याच डॉ. उदय नारकर यांनी सांगितल.
तर या देवस्थान शेतकरी परिषदेला राज्य किसान सभेचे सचिव डॉक्टर अजित नवले, देवस्थान शेतकऱ्यांचे नेते कॉम्रेड उमेश देशमुख, अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अशोक ढवळे यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याच ही यावेळी डॉ. नारकर यांनी सांगितलं.
पत्रकार परिषदेला अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात चरापले,खजिनदार अप्पा परीट,सुभाष निकम, अमोल नाईक, गणेश कुंभार, नवनाथ मोरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *