कोल्हापूरात १५ सप्टेंबर ला देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार समाजरत्न पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन

कोल्हापूर /प्रतिनिधी
कौन्सिल ऑफ एज्युकेशन ,मगदूम एण्डोसर्जरी इन्स्टिट्यूट आणि गांधी तत्व प्रचार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त रविवार दिं.१५ सप्टेंबर रोजी महापूर काळात मदत व आपत्ती व्यवस्थापनामध्ये समर्पित भावनेने कार्य केलेल्या विविध संस्थाना देशभक्त डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सकाळ डिजिटल माध्यम समूहाचे संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून कॉमर्स ऑफ कॉलेज बिंदू चौक सभागृहात सायंकाळी ५.३०वा.हा कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती कौन्सिल ऑफ एज्युकेशन चे सचिव व्ही.एन.पाटील व प्रा. अरुण शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यावर महापुराचे महाभंयकर संकट आले होते.यावेळी जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थेसह अनेक स्तरातून मदतीचे हात पुढे आले. दरम्यान महापूर काळात मदत ,बचाव,आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य करुन पूरग्रस्तांना जगण्याची उमेद दिलेल्या कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन ग्रुप (उज्ज्वल नागेशकर),दि मोहमेडन एज्युकेशन सोसायटी (मुस्लिम बोर्डिंग – गणी आजरेकर,आदिल फरास ),कै.अनंतराव कोरगावकर सामाजिक ट्रस्ट(अमोल कोरगावकर),कोल्हापूर प्रेस क्लब ( अध्यक्ष मोहन मेस्त्री, माजी अध्यक्ष विजय पाटील) ,गुरुदत्त शुगर शिरोळ (चेअरमन माधवराव घाटगे या संस्थेना प्राथनेधिक स्वरूपात कौन्सिल ऑफ एज्युकेशन ,मगदूम एण्डोसर्जरी इन्स्टिट्यूट आणि गांधी तत्व प्रचार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त रविवार दिं.१५ सप्टेंबर रोजी देशभक्त डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते आयर्नमँन आकाश कोरगावकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा सौ.रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष प्रसाद कामत,सचिव अॅड.व्ही.एन.पाटील, संचालक डॉ. विश्वनाथ मगदूम,अॅड.वैभव पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी असे आवाहन या वेळी करण्यात आले.
पत्रकार परिषदेला प्राचार्य व्ही ए.पाटील, संचालक डॉ. विश्वनाथ मगदूम उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!