ह्युमन राईट मिरर
Friday, 24 May 2019

कोल्हापूरात १७ मार्चला’ गाणी आमची-नजर तुमची ‘अंध मुलांचा अविष्कार: समाजातील दानशूरांकडून मदतीचे आवाहन

कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूरात ऑर्केस्ट्रा रायझिंग स्टार यांच्या वतीने अंध मुलांच्या कलागुणांना वाव मिळून व्यासपीठ निर्माण व्हावे. आणि त्या माध्यमातून समाजकार्य घडावे या हेतूने दिं.१७ मार्च रोजी शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी ५.३०वा. अंध मुलांचा अविष्कार ‘गाणी आमची-नजर तुमची ‘ या बहारदार ,विशेष गाण्यांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी समाजातील दानशूर मंडळी, सामाजिक संस्था आणि तालीम संघटनांनी मदत करावी असे आवाहन ग्रुपचे अध्यक्ष शुभम चौगले आणि किरण रणदिवे यांनी पत्रकार परिषदेत केले.
ऑर्केस्ट्रा रायजिंग स्टार ची स्थापना दिं.१२ फेब्रुवारी २०१८ रोजी असून त्यामधील सर्व कलाकार अंध आहेत. अंध मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यामाध्यमातून समाजकार्य घडावे. या हेतूने या ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे. नुकतेच या ग्रुपमधील सदस्य रोहन लाखे याच्या राजेंद्रनगर झोपडपट्टी येथील घराला आग लागून प्रापंचिक साहित्यासह वाद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे रोहनच्या अंध मित्रांचा डोळस हातभार या शीर्षकाखाली ग्रुपचे संस्थापक शुभम चौगले यांच्या पुढाकाराने दिं.१७ मार्च रोजी ‘गाणी आमची – नजर तुमची ‘ या बहारदार गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. त्यामधून रोहनला आर्थिक मदत करण्यात येणार आहे. तर या कार्यक्रमामध्ये सारेगमप फेम सिध्दराज पाटील, श्रध्दा घोंगडे,योगिता बोरगावे,सौरभ चौगले हे गायक तर वादक सचिन कांबळे, रोहन लाखे सादरीकरण करणार आहेत. तरी या सामाजिक कार्यक्रमासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था,तालीम संघटनांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन यावेळी आयोजकांच्यावतीने करण्यात आले.
पत्रकार परिषदेत ग्रुपचे अध्यक्ष शुभम चौगले, सारेगमप फेम सिध्दराज पाटील, राजू कोसंबी, रोहन लाखे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *