“कोजिमाशी”ची वार्षिक सर्वसाधारण सभा शांततेत पार पाडावी :प्रा.समीर घोरपडे

कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक (कोजिमाशी) पतसंस्थेची होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांच्या शंकेचे निरसन व प्रश्न मार्गी लागण्यासाठी शांततेत व आनंददायी वातावरणात पार पाडावी असे आवाहन प्रा.समीर शंकरराव घोरपडे यांच्या सह काही विरोधी सभासदांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
कोजिमाशीमध्ये दादा लाड हे तज्ञ संचालक म्हणून आजपर्यंत कार्यरत आहेत.इतरांना संधी देण्याऐवजी ते सत्तेशी चिकटून राहिले आहेत.सर्वसाधारण सभेत चेअरमन यांनी बोलायचे असते.पण लाड हे बेकायदेशीर हस्तक्षेप करत सभेत गोंधळ निर्माण करतात. असा आरोप करत प्रा.समीर घोरपडे सह काही विरोधी सभासदांनी त्यांचा वार्षिक सर्वसाधारण सभेतील बेकायदेशीर हस्तक्षेप टाळावा यासाठी जिल्हा उपनिबंधाकडे मागणी केली होती. त्यामुळे कोजिमाशीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तज्ञ संचालक दादासाहेब लाड यांच्या हस्तक्षेपा संदर्भात जिल्हा उपनिबंधकांनी दिलेल्या आदेशामुळे त्यांचा तिळपापड झाला आहे. त्यामुळे सभेत गोंधळ न होता सभासदांच्या शंकेचे निसरन होऊन संस्थेची सभा शांततेत आणि आनंदात पार पाडावी अशी आपली भूमिका असल्याची यावेळी समीर घोरपडे यांनी सांगितले.तर तज्ञ संचालक दादा लाड यांनी बेकायदेशीर हस्तक्षेप केला तर त्यांचा निषेध करण्यात येईल. तर बेकायदेशीर हस्तक्षेप त्यांनी टाळल्यास त्यांचा सभागृहात सत्कार करण्यात येणार असल्याच ही घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोजिमाशी मध्ये अन्य तज्ञ संचालकांना मात्र तीन ते सहा महिन्यात बदलले जाते. लाड यांना मात्र बदलले जात नाही. हा विरोधाभास सभासदांच्या लक्षात येण्यासारखा आहे. सभेतील त्यांचा हस्तक्षेप रोखण्यासाठी उपनिबंधकांनी दिलेला आदेश हा योग्यच आहे. त्यामुळे अभ्यास करण्याची आम्हाला गरज नाही. सत्तेसाठी लाचावलेल्या नेत्यांची वक्तव्ये हास्यास्पद आहेत. अशी टिकाही यावेळी करण्यात आली.सभा लोकशाही पद्धतीने शांततेत पार पडावी
संस्थेच्या सभेत लेखी प्रश्नांना वस्तुनिष्ठ उत्तरे द्यावीत,सभासदांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे समाधानकारक द्यावीत, कर्जाच्या व्याजदरात कपात करुन तो १२ टक्‍क्‍यांवरून १० टक्क्यावर करावा,सभासदांना शेअर सर्टिफिकेट तात्काळ मिळावीत,सभासद भांडवल मर्यादा शासकीय नियमाप्रमाणे वीस हजांराहून किमान एक लाख रुपये करावी,पात्र व्यक्तीस विनाकारण पूर्वग्रहदूषित उद्देशाने सभासदत्व नाकारु नये अआदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या.
पत्रकार परिषदेला संदीप पाटील, शहाजी पाटील,अंजली जाधव यांच्या सह अन्य सभासद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!