करवीर ब्राह्मण सभा येथे रामनवमीनिमित्त १३ एप्रिलला गीतरामायण कार्यक्रमाचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी
विवेकानंद केंद्र -कन्याकुमारी शाखा कोल्हापूर आणि प्रेरणा असोसिएशन फाँर ब्लाईंडस् यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिं.१३ एप्रिल रोजी रावनवमी निमित्त गीतरामायण चा कार्यक्रम ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम(तळ मजला) येथे सायंकाळी ५वा.आयोजित करण्यात आला आहे. तरी कोल्हापूर मधील गीतरामायण प्रेमी रामभक्त आणि विवेकानंद प्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अरुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केले.
प्रेरणा असोसिएशन फाँर ब्लाईंडस् चे १० दिंव्याग (पूर्ण अंध)कलाकार हा कार्यक्रम सादर करणार असून तो अतिशय दर्जेदार होण्यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली आहे. तर यामधील सात कलाकार महाराष्ट्राच्या विविध भागातून आले असून ३ कलाकार कोल्हापूरातील आहेत. प्रमुख गायक वादक आणि निवेदक हे मान्यताप्राप्त व्यावसायिक असून त्या -त्या क्षेत्रातील कलेचे ज्ञान त्यांनी संपादन केलेले आहे. त्यांचे या कार्यक्रमाचे सादरीकरण प्रथमच कोल्हापूरात होत आहे.
विवेकानंद केंद्र हे आध्यात्मिक पायावरील सेवा संघटन म्हणून गेली ५० वर्ष (१९७१)पासून कार्यरत आहे.शिक्षण -संस्कृती आणि विकास या मनुष्य निर्माण आणि राष्ट्र पुनरुत्थानाच्या उपक्रमाच्या मध्यमामधून मानवतेच्या सेवेचे कार्य विवेकानंद केंद्राच्या देशभर पसरलेल्या शाखेमधून केले जात आहे.दरम्यान रामनवमी निमित्त शनिवार दिं.१३ एप्रिल रोजी गीतरामायण या कार्यक्रमाचे आयोजन ब्राह्मण सभा करवीर येथे करण्यात आल असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आल. पत्रकार परिषदेला सतीश नवले उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *