जेएसडब्ल्यू सीमेंटतर्फे महाराष्ट्रात डोलवी वर्क्स येथे वाढीव क्षमता

मुंबई, ११ फेब्रुवारी २०१९: जेएसडब्ल्यू सीमेंट या १३ बिलियन डॉलर्सच्या संघटित आणि भारतातील आघाडीच्या हरित सीमेंट उत्पादक जेएसडब्ल्यू ग्रुपचा भाग असलेल्या कंपनीने महाराष्ट्रातील डोलवी वर्क्स या सुविधेतील उत्पादन क्षमता १ एटीपीएपासून २.२ एमटीपीएपर्यंत वाढवली आहे. या वृद्धीमुळे जेएसडब्ल्यू सीमेंटची सध्याची कार्यरत क्षमता १२.६ एमटीपीएवर पोहोचली आहे. यासोबतच देशभरात विविध उत्पादन केंद्रांवर कार्यक्षमता वृद्धिंगत करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे, जेएसडब्ल्यू सीमेंटची एकूण कार्यरत क्षमता एप्रिल २०१९ पर्यंत १४ एमटीपीएपर्यंत जाईल. डिसेंबर २०२० पर्यंत एकूण कार्यरत क्षमता २० एमटीपीएपर्यंत नेण्याच्या कंपनीच्या उद्दिष्टाचा आणि एकूण विकास योजनेचा भाग म्हणून ही योजना राबवली जात आहे.
अत्याधुनिक डोलवी केंद्र भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर मोक्याच्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. शिवाय, रेल्वे, रस्ते आणि जलमार्गांनी हे केंद्र जोडले गेले आहे. येथे दीर्घकाळ दमदार टिकाऊपणा देणारे पोर्टलँड स्लॅग सिमेंट (पीएससी) हे उच्च दर्जाचे हरित सिमेंट आणि चटकन सेट होणारे व उच्च प्रतीची ताकद आणि टिकाऊपणाची हमी देणारे कॉनक्रील एचडी हे प्रीमिअम सीमेंट उत्पादन यांची निर्मिती केली जाते. तसेच, वेगाने वाढणाऱ्या रीअल इस्टेट क्षेत्रासाठी महत्त्वाचे मानले जाणारे ग्राऊंड ग्रॅन्युलेटेडब्लास्ट फ्युरन्स स्लॅग (जीजीबीएस) हे उत्पादनही येथे तयार होते. महाराष्ट्र आणि आसपासच्या अनेक बाजारपेठांची हरित सिमेंटची मागणी पूर्ण करण्यात जेएसडब्ल्यू सीमेंटच्या डोलवी वर्क्स युनिटचा बराच फायदा होतो.
डोलवी येथे वृद्धिंगत क्षमतेचा शुभारंभ करताना जेएसडब्ल्यू सीमेंट लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्री. पार्थ जिंदाल म्हणाले, “आमचे डोलवी सीमेंट युनिट महाराष्ट्रातील आमच्या ग्राहकांच्या अगदी नजीक स्थित आहे. त्यामुळे, त्यांना अगदी जलदगतीने ताज्या दर्जाचे सीमेंट पुरवले जाईल, याची खातरजमा होते. यामुळे, महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासगाथेतील एक महत्त्वाचा भाग बनणे आम्हाला शक्य झाले आहे. शिवाय, डोलवी वर्क्स येथील उत्पादन क्षमतेत वृद्धी केल्याने आम्हाला २०२० पर्यंत २० एमटीपीएचे निर्मिती लक्ष्य गाठण्याचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होणार आहे. ब्राऊनफिल्ड आणि ग्रीनफिल्ड प्रकल्पांच्या माध्यमातून आम्ही हे क्षमता लक्ष्य गाठणार आहोत. या क्षमतेत आणखी वृद्धी करण्याच्या दृष्टीने आम्ही विविध इनऑरगॅनिक संधींचाही वेध घेत आहोत.”
भारताचा प्रगतीशील आर्थिक विकास, भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्राला चालना देण्यासाठी सातत्याने दिला जाणारा भर आणि सीमेंट वापरात वाढ होण्यामागील मुख्य घटक असलेल्या प्रत्यक्ष मागणीवर जेएसडब्ल्यू सीमेंटचा विश्वास आहे. नव्या नागरी विकास योजनेअंतर्गत ५०० शहरांचा विकास केला जात आहे आणि १०० स्मार्ट शहरांच्या उभारणीलाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे, सीमेंट आणि बांधकाम क्षेत्राला बराच फायदा होण्याचा अंदाज आहे. या संधींचा लाभ घेण्यासाठी कंपनीने २०२० पर्यंत २० एमटीपीए निर्मिती क्षेत्राचे लक्ष्य ठेवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!