जॉन डियरने भारतीय कृषीक्षेत्राला दिली शक्ती व तंत्रज्ञानाची उत्प्रेरणा

जॉन डियर ही आद्य कृषी उपकरण उत्पादन कंपनी ट्रॅक्टर व कृषी उपकरणांच्या क्षेत्रामध्ये कल्पक उत्पादने व नवीन तंत्रज्ञाने आणण्यात कायमच आघाडीवर राहिली आहे. जॉन डियर ही कृषी उपकरण विभागातील आघाडीची कंपनी असून, नवोन्मेषकारी उत्पादन व सेवांसाठी ओळखली जाते. या कंपनीने नवीन तंत्रज्ञानाने युक्त व शक्तीशाली अशा ट्रॅक्टर, हार्वेस्टर व इम्प्लिमेंट्सची नवीन श्रेणी बाजारात आणली आहे. ट्रॅक्टर व हार्वेस्टरच्या या श्रेष्ठ तंत्रज्ञानाने युक्त अशा मॉडेल्समुळे शेतीची कार्यक्षमता सुधारेल, विविध कृषीहवामान परिस्थिती, पिकांचे प्रकार यांसाठी ही मॉडेल्स अनुकूल ठरतील आणि अवजड उपकरणांची ती अचूक ताळमेळ साधतील.
ट्रॅक्टर्स व हार्वेस्टर्सच्या आज लाँच झालेल्या ७ नवीन मॉडेल्सपैकी ५४०५ गीअर प्रो ६३एचपी ट्रॅक्टर हे मॉडेल कृषी क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवून आणणारे ठरेल. शेतीविषयक कामांना पुढील स्तरावर नेण्याची क्षमता यात आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या व वैविध्यपूर्ण मागण्या पूर्ण करण्यासाठी हे मॉडेल खास डिझाइन करण्यात आले आहे. टिल्ट स्टीअरिंग, १२X४ टीएसएस ट्रान्समिशन आदी सुविधांमुळे हा ट्रॅक्टर अनेक गोष्टींसाठी उपयुक्त ठरतो. शेतीची कामे, लोडर व डोझर म्हणून तसेच मालाच्या वाहतुकीसाठी तो उपयोगी पडतो. शिवाय जेडी लिंक (टेलीमॅटिक्स) ही अतिरिक्त सुविधा असल्याने तो भारतीय शेतकऱ्यांना मोलाचे सहाय्य करतो.
४० अश्वशक्ती (हॉर्सपॉवर- एचपी) विभागातील ५१०५ हे मॉडेल म्हणजे भारताच्या इतिहासातील ४डब्ल्यूडी पर्याय देणारा पहिला ट्रॅक्टर आहे. एकेरी आणि दुहेरी क्लच, दुहेरी पीटीओ आणि एससीव्हीमुळे हा ट्रॅक्टर विविध कृषीकामांसाठी उपयुक्त असा वैविध्यपूर्ण ट्रॅक्टर आहे. कोरड्या तसेच दलदलीच्या जमिनीवर हा काम करू शकतो. यातील अतिप्रगत सुविधा म्हणजे सर्वोत्तम उचल क्षमता (लिफ्ट कपॅसिटी), जेट स्प्रे कुलिंग प्रणालीसह असलेले आधुनिक इंजिन, प्लॅनेटरी गीअर रिडक्शन आणि ३३ एचपीच्या ५००५ मॉडेलचा ३४ किलोमीटर प्रतितास एवढा कमाल वेग. यामुळे नुकतीच कामाला सुरुवात केलेल्या महत्त्वाकांक्षी शेतकऱ्यांना अन्य शेतकऱ्यांच्या बरोबरीने संधी मिळते.
“गेल्या दोन दशकांत आम्ही अनेक प्रगत सुविधा असलेली उत्पादने बाजारात आणली आहेत. पॉवर स्टीअरिंग, ऑइल इमर्स्ड डिस्क ब्रेक्स, प्लॅनेटरी रिडक्शन, फोर्स फीड ल्युब्रिकेशन आणि उच्च टॉर्क देणारी यंत्रे ही या सुविधांची उदाहरणे,” असे व्यवस्थापकी संचालक सतीश नाडीगर म्हणाले. “या सुविधा भारतात प्रथमच जॉन डियरनेच आणल्या आणि आता या सुविधा म्हणजे उद्योगक्षेत्रातील मापदंड झाले आहेत.”
सतीश पुढे म्हणाले, “आम्ही नवोन्मेषांचा पाठपुरावा सुरूच ठेवला आहे आणि शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या आधारे शक्ती देणारी ट्रॅक्टर व हार्वेस्टरची नवीन श्रेणी सर्वांसमोर आणली आहे. आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करणाऱ्या व त्या दर्जाच्या कृषी प्रणालींची व उपकरणांची विस्तृत श्रेणी विकसित करण्याला आम्ही प्राधान्य देत आहोत आणि त्यायोगे शेती करण्याचा अनुभव अधिक समृद्ध करत आहोत. हे नवीन श्रेणीतील ट्रॅक्टर्स खात्रीशीर, खूप टिकाऊ, सुरक्षिततेचे नियम पूर्ण करणारे असून, यातील अनेक दर्जेदार सुविधा जागतिक मानकांची पूर्तता करणाऱ्या आहेत.”
“आमची उत्पादन श्रेणी सखोल संशोधनावर तसेच भारतातील कृषी क्षेत्राबद्दलच्या ज्ञानावर आधारलेली आहे. आमच्या ग्राहकाला पैशाचा मोबदला प्रभावीपणे देणारी, कामात होणारा खर्च कमी करणारी, दर्जेदार आणि श्रेष्ठ दर्जाच्या तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ही नवीन उत्पादने व्यक्तीगत शेतकऱ्यांना, कंत्राटी शेतकऱ्यांना व कस्टम हायरिंगच्या व्यवसायातील व्यावसायिकांना मदत करतील. आमच्या वित्तीय सेवा पारदर्शक, वेगवान व सोयीस्कर आहेत आणि आमच्या ग्राहकांना हेच हवे असते,” असे विक्री व मार्केटिंग संचालक राजेश सिन्हा म्हणाले. “चांगली कामगिरी करणारी, वक्तशीर व कमी खर्चातील उत्पादने पुरवण्याच्या जॉन डियरच्या तत्त्वज्ञानाची ही उत्‍पादने पूर्तता करतात. आम्ही आमच्या ग्राहकांना पाच वर्षे वॉरंटीच्या स्वरूपात हमी देतो आणि आमच्या उत्पादनांचे सुटे भाग किंवा त्यासाठीच्या सेवा सहज उपलब्ध असतात,” असे सिन्हा म्हणाले.
“भारतातील कृषीक्षेत्राचे जलदरित्या आधुनिकीकरण होत आहे. या क्षेत्रात एकात्मिक दृष्टिकोन व सोल्युशन्‍स वापरली जात आहेत. अचूकता व प्रगत तंत्रज्ञान यांना पिकाच्या मूल्यसाखळीत महत्त्वाचे स्थान प्राप्त होत आहे. आपण शेतकऱ्यांना शक्तिशाली, कल्पक आणि अतिप्रगत उत्पादने पुरवणे व भारतीय बाजारपेठेत आधुनिक तंत्रज्ञान आणणे आवश्यक आहे,” असे जनव्यवहार विभागाचे संचालक मुकुल वार्ष्णेय म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *