जिल्हा परिषदेत क्रांतिसिंह नाना पाटील जयंती उत्साहात

कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये
क्रांतिसिंह नाना पाटील यांची उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसुळ यांचे हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या फोटो पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सुत्रसंचलन सहाय्यक शिक्षक बी.पी. माळवे यांनी करून क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला.
यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण), सोमनाथ रसाळ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत विभाग)राजेंद्र भालेराव , कार्यकारी अभियंता (बांधकाम विभाग)विजय कांडगावे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राहूल कदम यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!