जिजाजी छत पर हैं’मध्‍ये लोक गायब का होत आहेत?

‘सोनी सबवरील मालिका ‘जिजाजी छत पर हैं’मध्‍ये रहस्‍यमय अदृश्‍य होण्‍याच्‍या घटना सुरू झाल्‍या आहेत. या घटनेबाबत माहित नसलेल्‍या इलायचीने (हिबा नवाब) तिच्‍या मित्राचा टॅटू पाहिल्‍यानंतर पंचमला (निखिल खुराणा) त्‍याच्‍या छातीवर कायमस्‍वरूपी तिचे नाव गोंदण्‍यासाठी मनवले आहे. दुसरीकडे, करूणा मुरारीची त्‍याला सुईची वाटत असलेल्‍या भितीची चेष्‍टा करते. मुरारी हे आव्‍हान स्‍वीकारत टॅटू काढण्‍यासाठी टॅटू स्‍टुडिओमध्‍ये जातो.

मुरारी (अनुप उपाध्‍यय) एका ऐकू न येणा-या टॅटू आर्टिस्‍टकडून टॅटू काढून घेत असतो. टॅटू काढताना करूणाचे नाव लिहिण्‍यामध्‍ये चुकी होते. मुरारी ही चूक लपवण्‍यासाठी स्‍वत:ला आच्‍छादून ठेवण्‍याचा प्रयत्‍न करतो. सर्वत्र अफवा पसरलेली असते की, वेड्याच्‍या हॉस्पिटलमधून एक वेडा पळाला आहे आणि तो चांदनी चौकच्‍या रस्‍त्‍यांवर फिरतो आहे. या वेड्याची एक गोष्‍ट विलक्षण आहे. तो पुरूषांना कपडे परिधान केलेल्‍या स्थितीमध्‍ये पाहू शकत नाही आणि ते टॉवेलमध्‍ये असतील तरच त्‍याला बरे वाटते.

या वेड्या माणसाची स्थिती पाहता मुरारीचा चुकीचा टॅटू लपून राहिल का की वेड्या माणसाच्‍या कृत्‍यांपासून वाचण्‍यासाठी मुरारीला टॉवेल लपेटावा लागेल?

पंचमची भूमिका साकारणारा निखिल खुराणा म्‍हणाला, ”मुरारीची स्‍मरणशक्‍ती काही काळासाठी गेल्‍यामुळे पंचमला खूप आनंद झाला आहे. पंचम व पिंटू कधीपर्यंत सत्‍य लपवून ठेवू शकतात हे पाहणे खूपच रोमांचक ठरेल. आगामी एपिसोड्स उत्‍साहवर्धक टि्वस्‍टसह अत्‍यंत मजेशीर आहेत. प्रेक्षक त्‍यांचा मनमुराद आनंद घेतील.”

मुरारीची भूमिका साकारणारे अनुप उपाध्‍याय म्‍हणाले, ”मुरारी मोठ्या संकटात सापडला आहे. टॅटू काढून करूणाला प्रभावित करण्‍याच्‍या प्रयत्‍नांमध्‍ये तो चुकीचा टॅटू काढून घेतो. एपिसोड्स विलक्षण ट्विस्‍ट्ससह खूपच विनोदी असणार आहेत. ‘जिजाजी छत पर हैं’ मालिकेला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम व प्रतिसाद मिळत असल्‍याचे पाहून मी खूपच खूश आहे.”

हे रहस्‍य उलगडताना व इतर गोष्‍टी जाणण्‍यासाठी पाहत राहा ‘जिजाजी छत पर हैं’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता, फक्‍त सोनी सबवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!