‘जिजाजी छत पर है’ने साजरा केला पहिला वर्धापनदिन!

विनोदी पटकथेसह प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी सोनी सबवरील मालिका ‘जिजाजी छत पर है’ने एक नवीन टप्‍पा गाठला आहे. मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन करत एक वर्ष पूर्ण केले आहे. ही मालिका दर्शकांमध्‍ये लोकप्रिय आहे. तसेच मालिका सुरू झाल्‍यापासून मालिकेमधील पात्रांना प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळत आहे. तसेच मालिकेची भरभरुन प्रशंसा देखील केली जात आहे. ‘जिजाजी छत पर है’चे सर्व कलाकार व टीमसोबत निखिल खुराणा व हिबा नवाब यांनी एकत्र केक कापत हा आनंदमय क्षण साजरा केला. तसेच त्‍यांनी प्रेक्षकांचे त्‍यांनी दिलेले प्रेम व पाठिंब्‍यासाठी आभार मानले.पंचमची भूमिका साकारणारा निखिल खुराणा आपला आनंद व्‍यक्‍त करत म्‍हणाला, ”मालिकेने केलेली उत्‍तम कामगिरी आणि प्रेक्षकांकडून मिळालेली प्रशंसा पाहून खूप आनंद होत आहे. प्रेक्षकांच्‍या पाठिंब्‍यामुळेच आम्‍ही आमचे सर्वोत्‍तम कौशल्‍य सादर करू शकलो आणि आम्‍हाला प्रत्‍येक दिवशी अथक मेहनत करण्‍याची प्रेरणा मिळाली. ‘जिजाजी छत पर है’ मालिका आणखी बरीच वर्षे चालेल अशी आम्‍ही आशा करतो.’इलायचीची भूमिका साकारणारी हिबा नवाब म्‍हणाली, ”आमची मालिका ‘जिजाजी छत पर है’ने एक वर्ष पूर्ण केले आहे, ज्‍यामुळे आमच्‍या संपूर्ण टीमसाठी हा खास क्षण आहे. मालिकेसाठी हे वर्ष उत्‍तमच राहिले आहे. तसेच आमच्‍या प्रेक्षकांकडून आम्‍हाला भरपूर प्रेम मिळाले. त्‍यांनी दिलेल्‍या पाठिंब्‍यासाठी मी प्रत्‍येकाचे आभार मानते. आम्‍ही सर्वांचे असेच मनोरंजन करत राहू अशी आशा करतो.”
पहात रहा ‘जिजाजी छत पर है’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता फक्‍त सोनी सबवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *