‘माय नेम इज लखन’मधील पम्‍मी ऊर्फ अर्चना पुरन सिंग म्‍हणते

मालिका ‘माय नेम इज लखन’ची संकल्‍पना काय आहे?

‘माय नेम इज लखन’ मालिका चांगले व वाईटामधील संघर्षाला सादर करते. हा संघर्ष मुलगा व त्‍याच्‍या वडिलांच्‍या कथेच्‍या माध्‍यमातून सादर करण्‍यात आला आहे, जेथे मुलगा हा ‘वाईट’ आणि वडिल हे ‘चांगले’ दाखवण्‍यात आले आहेत. यामध्‍ये एका मध्‍यस्‍थाची भूमिका देखील आहे, जी मी साकारत आहे, ती म्‍हणजे आई. ती मुलगा व वडिल या दोघांच्‍या बाजूने विचार करते. ही मालिका शेवटी चांगल्‍याचा विजय होतो की वाईटाचा, या गोष्‍टीला सादर करते.

मालिकेमधील तुझ्या भूमिकेबाबत सांग?

मी मालिकेमध्‍ये लखनची आई पम्‍मीची भूमिका साकारत आहे. पम्‍मीचा जन्‍म पंजाबमध्‍ये झाला असून ती तेथेच मोठी झाली आहे. काही वर्षांपूर्वी तिच्‍या पतीसह मुंबईमध्‍ये स्‍थायिक झाले असताना देखील त्‍यांनी त्‍यांची संस्‍कृती व नैतिक मूल्‍ये राखली आहेत. मालिकेमध्‍ये माझा पती शिक्षक आहे. माझे त्‍याच्‍यासोबत चांगले नाते आहे. पण मुलाच्‍या बाबतीत आमच्‍यामध्‍ये नेहमीच भांडण होतात. मालिकेमध्‍ये मी माझ्या मुलावर खूप प्रेम करते आणि मी नेहमी त्‍याचीच बाजू घेते. मी त्‍याच्‍या चुकीकडे डोळेझाक करते. दुसरीकडे माझ्या पतीला वाटते की ”माझा मुलगा चुकीचे वागत आहे आणि मी त्‍याच्‍याकडे लक्ष दिले पाहिजे.” माझी भूमिका मुलगा व वडिलांमध्‍ये समतोल राखण्‍याचा प्रयत्‍न करते, कारण तिचे दोघांवरही प्रेम आहे.

मालिकेमधील तुझ्या पतीसोबत काम करण्‍यासाठी तू किती उत्‍सुक आहे?

खरे सांगायचे झाले तर मला कधी-कधी भिती वाटते की आम्‍ही वास्‍तविक जीवनात खरे पती-पत्‍नी आहोत, तर मग आम्‍ही पडद्यावर कसे असू. परमीत व मी लेखनासारख्‍या इतर विविध गोष्‍टी एकत्र करतो आणि पडद्यामागे देखील आमच्‍यामध्‍ये चांगले नाते आहे. मला खात्री आहे की पडद्यावर देखील असेच नाते दिसून येणार आहे. आम्‍ही दोघेही व्‍यावसायिकाप्रमाणे कामाकडे पाहतो. मालिकेमध्‍ये तो माझ्या पतीची भूमिका साकारत आहे, याचा अर्थ असा नाही की, दृश्‍यामध्‍ये मी त्‍याला ग्रँटेड मानेन. आम्‍ही सेटवर असताना प्रोफेशनल वागतो. पण सीननंतर ”कट” शब्‍द ऐकताच आम्‍ही पती-पत्‍नीची भूमिका बाजूला ठेवून आमच्‍या व्‍हॅनिटी वॅनमध्‍ये एकत्र पदार्थ व चहाचा आस्‍वाद घेतो. व्‍हॅनिटी वॅन ही आमच्‍यासाठी एका लहान घराप्रमाणेच आहे. एकूण पाहता आमच्‍या वैयक्तिक नात्‍यामध्‍ये खूपच आरामदायीपणा वाटतो. आम्‍ही एकत्र नवीन प्रोजेक्‍टवर काम करत असल्‍यामुळे खूपच चांगले वाटते.

तू अनेक रिअॅलिटी शोजमध्‍ये काम केले आहेस आणि आता काल्‍पनिक मालिकेमध्‍ये काम करत आहे. या दोन्‍ही प्रकारांमध्‍ये काय फरक आहे?

मी खरेतर ‘मि. या मिसेस’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘जुनून’, ‘आसमॉं से टपकी’, ‘सामनेवाली खिडकी मैं’ अशा काल्‍पनिक मालिकांसह माझ्या करिअरची सुरुवात केली. मला काल्‍पनिक मालिका आवडतात. अशा मालिकांमुळे मला अभिनेत्री म्‍हणून माझा सर्वोत्‍तम अभिनय सादर करण्‍याची संधी मिळते. काल्‍पनिक मालिका तयार करण्‍यासाठी आवश्‍यक असलेली सर्जनशीलता मला खूप आवडते आणि याच आवडीने मला ‘माय नेम इज लखन’मध्‍ये काम करण्‍यास भाग पाडले. मला आवडत असलेली खासकरून विनोदी भूमिका करायला मला आवडते. म्‍हणूनच मी या मालिकेबाबत खूपच उत्‍सुक आहे.

माझ्या मते, दोन्‍ही प्रकारच्‍या मालिकांमध्‍ये फरक म्‍हणजे रिअॅलिटी शोजमध्‍ये सहभाग घेणे अत्‍यंत तणावग्रस्‍त असते आणि काल्‍पनिक मालिकेमधील अभिनयाप्रमाणे परीक्षणामध्‍ये फारसी मौजमजा येत नाही. माझ्यासाठी काल्‍पनिकसह कॉमेडी हे चांगले मिश्रण आहे आणि ‘माय नेम इज लखन’मध्‍ये हीच गोष्‍ट आहे.

तू प्रथम कोणाला प्राधान्‍य देशील – टेलिव्हिजन की चित्रपट?

सर्जनशीलतेच्‍या समाधानासाठी चित्रपट आणि पैशासाठी टेलिव्हिजन.

एचएनआयएलच्‍या सर्व पात्रांपैकी तुझे आवडते पात्र कोणते?

मला लखनची भूमिका आवडते. मला वाटते ही चांगली भूमिका आहे आणि श्रेयस ही विनोदी व जटिल भूमिका मिळाल्‍याने खूपच नशीबवान आहे. प्रोमोशूटदरम्‍यान माझ्या लक्षात आलेली गोष्‍ट म्‍हणजे तो अत्‍यंत शिस्‍तबद्ध व समर्पित अभिनेता आहे. तो भूमिकेला न्‍याय देईल, याबाबत माझ्या मनात काहीच शंका नाही. मी श्रेयस पडद्यावर साकारत असलेली लखनची भूमिका पाहण्‍यास खूपच उत्‍सुक आहे.

प्रेक्षकांसाठी एखादा संदेश?

माय नेम इज लखन’ ही आगळीवेगळी मालिका आहे. ही एका तासाची काल्‍पनिक मालिका आहे, जी भारतातील इतर समान काल्‍पनिक मालिकांप्रमाणे नाही. तसेच प्रत्‍येक एपिसोडच्‍या शेवटी समस्‍येचे निराकरण करणा-या मालिकांप्रमाणे देखील ही मालिका नाही. आमची कथा पुढे-पुढे जाते आणि प्रेक्षकांना प्रत्‍येक एपिसोड पाहण्‍यास भाग पाडते. श्रेयस, अर्चना, परमीत व संजय नार्वेकर अशा उत्‍साही कलाकारांसह वीकेण्‍ड निश्चितच चांगला जाणार आहे आणि ते प्रेक्षकांसोबतच नवीन काहीतरी करण्‍याचा प्रयत्‍न करणा-या कलाकारांसाठी देखील उत्‍साहपूर्ण ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *