ह्युमन राईट मिरर
Monday, 22 Apr 2019

स्विडीश लक्झरी दक्षिण मुंबईत दाखल

मुंबई– वॉल्वो कार इंडिया या कंपनीने दक्षिण मुंबईतील प्रभादेवी परिसरात केआयएफएस मोटर्सच्या मालकीखाली आपले नवीन दालन सुरू करून देशातील आपल्या तगड्या नेटवर्कमध्ये भर घातली आहे. कंपनीचे हे मुंबईतील दुसरे दालन असून भारतातील एका सर्वात मोठ्या लक्झरी कार बाजारपेठेप्रति झपाट्याने वाढणाऱ्या लक्झरी कार मेकर कंपनीची कटिबद्धता यातून सिद्ध होते. मुंबईच्या उच्चभ्रू परिसरातील मुख्य रस्त्याला लागूनच हे दालन थाटण्यात आले असून सदर ब्रॅण्डच्या नावाला शोभेल असाच हा परिसर आहे. दक्षिण मुंबईतल्या या नव्या दालनासह भारतात वॉल्वो कार्सची एकूण 25 दालने आहेत. या दालनाचे उद्घालटन वॉल्वो कार इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. चार्ल्स फ्रम्प यांच्या हस्ते करण्यात आले.

नवीन दालनाच्या अधिकृत उद्घाटनाबाबत बोलताना वॉल्वो कार इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक चार्ल्स फ्रम्प म्हणाले, “भारतातील सर्वात उच्चभ्रू कुटुंबे दक्षिण मुंबईत राहत असून वॉल्वोने या परिसरात नवे दालन उघडून लक्झरी कार सेगमेंटमध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. पश्चिम उपनगरांमध्ये केआयएफएस मोटर्स आमच्यासाठी उत्कृष्ट भागीदार ठरले आहेत. दक्षिण मुंबईतल्या या नव्या दालनामुळे मुंबई व भारतातील वॉल्वो कार्सच्या व्यापाराला अधिक चालना मिळणार आहे.”

केआयएफएस मोटर्सचे डिलर प्रिन्सिपल श्री. विमल खांडवाला म्हणाले, “आमच्या या दुसऱ्या दालनातून वॉल्वो कार व्यवस्थापनाचा आमच्यावरील विश्वास प्रतिबिंबीत होतो. दक्षिण मुंबईच्या अत्यंत महत्वाच्या भागात वसलेल्या या दालनाद्वारे वॉल्वो कार्सच्या छताखाली शहरातील उच्चभ्रू ग्राहकवर्ग येऊ शकणार आहे. या महत्वाच्या बाजारपेठेत वॉल्वोची व्यापारवृद्धी होण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *