ह्युमन राईट मिरर
Friday, 24 May 2019

जग्वार आय-पेस ठरली युरोपियन कार ऑफ द इअर

जिनिव्हा – ऑल-इलेक्ट्रिक जग्वारला युरोपियन कार ऑफ द इअर अॅवॉर्ड २०१९मध्ये कार ऑफ द इअर' पुरस्कार देण्यात आला. जग्वारला पहिल्यांदाच हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.
युरोपियन कार ऑफ द इअरच्या परीक्षकांमध्ये २३ देशांमधील ६० मोटरिंग पत्रकारांचा समावेश होता.तांत्रिक नाविन्यता, डिझाइन, परफॉर्मन्स, कार्यक्षमता आणि किमतीचे योग्य मुल्य या निकषांवर हा
पुरस्कार देण्यात आला. जग्वार लँड रोव्हरचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो, डॉ. राल्फ स्पेथ म्हणाले, "आमचे पहिले इलेक्ट्रिक वाहन जग्वारला पहिला युरोपियन कार ऑफ द इअर जिंकून देणारे वाहन ठरले आहे, याचा आम्हाला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो." "युकेमध्ये आय-पेस ची डिझाईन आणि निर्मिती करण्यात आली आहे. हे आजवरचे तंत्रज्ञानदृष्ट्या सर्वात
प्रगत असे इलेक्ट्रिक वाहन आहे. ही गाडी आजवरच्या सगळ्या संकल्पना बदलून टाकेल. युरोपियन कार ऑफ द इअर हा पुरस्कार मिळाल्याने आमच्या जागतिक दर्जाच्या टीमने जे काम केले आहे ते खऱ्या अर्थाने सार्थक झाले आहे." युकेमध्ये डिझाइन आणि निर्मिती करण्यात आलेल्या जग्वार आय-पेस ने जगभरात लक्षणीय विक्री केली आहे. आजवर ८००० हून अधिक ग्राहकांनी ही गाडी घेतली आहे. यात ७५ टक्के वाटा युरोपातील ग्राहकांचा आहे.* रस्त्यावर चालणाऱ्या किंवा दिसणाऱ्या इतर कोणत्याही गाडीची तुलना आय-पेस सोबत होऊ शकत नाही. इलेक्ट्रिक शक्ती आणि सुयोग्य अॅल्युमिनिअम आर्किटेक्चरचा संपूर्ण लाभ घेण्याच्या दृष्टीने या गाडीची रचना करण्यात आल्याने यात स्पोर्ट कारचा परफॉर्मन्स मिळतो आणि एसयूव्ही गाडीची व्यवहार्यता. जग्वार पब्लिक चार्जिंग सर्विसचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांसाठी समर्पित अॅप किंवा आरएफआयडी कीचा वापर करून चार्जिंग अधिक सुलभ करण्यात आले आहे. सुयोग्यरितीने तयार करण्यात आलेले चार्जिंग पॅकेजेस आणि दरांना सोप्या मासिक बिलात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे, आय-पेस ग्राहकांना संपूर्ण युरोपमधील ८५०००हून अधिक चार्जिंग पॉईंट्सचा लाभ घेता येतो. वर्षभरापूर्वी सादर झालेल्या आय-पेस ला ५५ पुरस्कार लाभले आहेत. यात जर्मन, नॉर्वेजियन आणि यूके कार ऑफ द इअर, बीबीसी टॉपगीअर मॅगझिन ईव्ही ऑफ द इअर, चायना ग्रीन कार ऑफ द इअर आणि ऑटोबेस्टच्या इकोबेस्ट पुरस्काराचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *