ह्युमन राईट मिरर
Friday, 24 May 2019

इंडियन सोसायटी आँफ ओरल इंप्लांटोलाँजिस्ट संस्थेतर्फे १६ व १७ मार्चला दुसऱ्या राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूरात इंडियन सोसायटी आँफ ओरल इंप्लांटोलाँजिस्ट(implantologists) संस्थेच्या वतीने दिं.१६ आणि१७ मार्च रोजी हाँटेल सयाजी येथे दुसरे राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय पातळीवरील या संघटनेचे संमेलन कोल्हापूरात प्रथमच होणार असून त्याचे उद्घाटन दिं.१६ मार्च रोजी सकाळी ११.३०वा हाँटेल सयाजी येथे विविध प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती संमेलनाचे सचिव डॉ. दिग्विजय पाटील आणि डॉ. पार्थ भिंगार्डे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
इंडियन सोसायटी आँफ ओरल इंप्लांटोलाँजिस्ट(implantologists) ही संस्था दंत रोपण शास्र व त्या संदर्भातील अद्ययावत माहिती आणि तंत्रज्ञान सर्व दंतरोपण तज्ञापर्यंत पोचविण्याचे काम गेली ३० वर्षे झाली करत आहे. याच संदर्भातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीची देवाणघेवाण या संमेलनाच्या निमित्ताने होणार आहे. पश्चिम,दक्षिण महाराष्ट्र बरोबरच संपूर्ण देशभरातून ३०० दंतरोपण तज्ञ या संमेलनासाठी उपस्थित राहणार आहेत.यामुळे रुग्णांना मिळणाऱ्या अत्याधुनिक आणि शास्रोक्त सेवेमध्ये भर पडणार आहे.तर या संमेलनाच्या निमित्ताने होणाऱ्या विचारमंथनातून या परिसरातील रुग्ण सेवेमध्ये आमुलाग्र बदल होईल अशी आशा व्यक्त करून कोल्हापूरात प्रथमच होणाऱ्या राष्ट्रीय संमेलनाचा लाभ सर्व दंत वैद्यकीय तज्ञांनी घ्यावा असे आवाहन यावेळी डॉ. दिग्विजय पाटील व डॉ. पार्थ भिंगार्डे यांनी केले.
पत्रकार परिषदेला संमेलनाचे अध्यक्ष अद्वैत आफळे, संस्थेचे अध्यक्ष राजीव खोसला,सचिव डॉ. परेश काळे,डॉ. रोहन जेमेनिस उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *