ह्युमन राईट मिरर
Friday, 24 May 2019

दुर्गम ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी हातकणंगले लोकसभा निवडणूक लढवणार : संग्रामसिंह गायकवाड (सरकार)

कोल्हापूर/प्रतिनिधी : शाहूवाडी-पन्हाळा परिसरासह दुर्गम ग्रामीण भागाच्या मूलभूत सोयीसुविधा उभारणीसह सर्वांगीण विकास आणि समाजात काबाडकष्ट करणाऱ्या बारा बलुतेदारांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण हातकणंगले लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे संग्रामसिंह गायकवाड(सरकार) यांनी कोल्हापूरात पत्रकार बैठकीत सांगितले.
गेली पंचवीस वर्षाहून अधिकाळ आपण सर्वांगीण जीवनात कार्यरत असून छ.राजाराम सहकारी कारखाना संचालक पदासह ग्राम विकास सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात आपण सक्रीय आहोत.या सर्व प्रदीर्घ अनुभवाचा फायदाही निश्चितपणे खासदार पदाच्या निवडणुकीत होईल असा दावाई त्यांनी यावेळी केला. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा सुविधा मिळाव्यात तसेच युवावर्गाला वैद्यकीय शिक्षण घेता यावे यासाठीच शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम जन्य निसर्गमय अशा आकुर्डे गावी संजयदादा नगर मध्ये श्रीमंत जयसिंगराव गायकवाड आँफ मेडिकल काँलेज अँण्ड हाँस्पिटल सुरू केले असून त्याचा लाभ निश्चितपणे परिसरात होत आहे. ग्रामीण स्तरावर उच्च वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवा सुविधा उपलब्धीचे अनुकरण उपक्रम ठरला आहे. असे संग्रामसिंह गायकवाड यांनी नमूद केले.
माजी खासदार कै.उदयसिंह गायकवाड आणि माजी आमदार बंधू संजयदादा गायकवाड यांच्या कार्याची पार्श्वभूमी आणि प्रदीर्घ काळ कुंटुबांतील घटक म्हणून मानस पुत्र म्हणूनच डॉ. डी.वाय.पाटील (दादा) यांचा लाभलेला सहवास आणि त्यामधून आलेली व्यापक सर्वसमावेशक विकास रचनात्मक कार्याची दूरदृष्टी तसेच कायदा आणि व्यवस्थापनातील उच्च शिक्षण यामुळे आपण खासदार पदाला योग्य न्याय देऊ शकतो.त्यासाठी आपण अपक्ष उमेदवार म्हणून जनतेसमोर जात आहे. त्यास मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे संग्रामसिंह गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
पत्रकार परिषदेला रामचंद्र कोळेकर, सरोज फडके उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *