विद्या प्रबोधिनीमध्ये UPSC पूर्व तयारी कार्यशाळा

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य महसूलमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नातून विद्याप्रबोधिनी या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून कोल्हापूर सारख्या ग्रामीण पाश्वभूमी असलेल्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थांना स्पर्धा परिक्षांची तयारी करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
सध्या शहरांबरोबर ग्रामीण भागामध्ये स्पर्धा परीक्षा संबंधी मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण होत आहे. अगदी १२ वी नंतर UPSC चे ध्येय समोर ठेवून विद्यार्थी तयारी करीत आहेत. सध्या IAS म्हणजे सिव्हील सर्व्हीस परीक्षांची जागरूकता वाढताना दिसत आहे. विद्यार्थी अशा परिक्षांच्या माध्यमातून अधिकारी बनण्याची स्वप्न पाहत आहे. अशा प्रकारची मोठी ध्येय बाळगणा-या विद्यार्थांसाठी, नागरी सेवा परीक्षेमध्ये यश मिळवण्याच्या ध्येयपूर्तीसाठी विद्या प्रबोधिनी मध्ये दिनांक ७ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ११ वाजता UPSC पूर्व तयारी बाबत मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेमध्ये UPSC परीक्षेत यश मिळवण्यासाठी लागणा-या मुलभूत बाबींची चर्चा, परीक्षेची सुरवात कधी, केव्हा आणि कशा पद्धतीने केली पाहिजे, या परीक्षांचा सध्याचा अभ्यासक्रम काय, परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे विस्तृत विवेचन आणि सध्याचा कल अशा अनेक गोष्टींची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
तरी नागरी सेवा परीक्षांची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी सदर कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राहुल चिकोडे, UPSC प्रमुख प्रवीण गांगुर्डे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *