धीरज बजागे याची राज्यात ३३ व्या क्रमांकाने कर सहाय्यक पदी निवड

विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश
कोल्हापूर /प्रतिनिधी
दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मंत्रालय लिपिक पदाच्या परीक्षेत विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या सुहास पाटील व धीरज बजागे या दोन विद्यार्थ्यांची मंत्रालय लिपिक पदी निवड झाली आहे. त्याचबरोबर नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कर सहायक (Tax Assistant) पदाच्या परीक्षेत धीरज बजागे (रा.पडवळवाडी, ता.पन्हाळा) या विद्यार्थ्याची राज्यात ३३ व्या क्रमांकाने कर सहाय्यक पदी निवड झाली आहे. तसेच राज्यसेवा परीक्षेतून कक्ष अधिकारी पदी शिरीष पाटील यांची निवड झाली. दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या मंत्रालय लिपिक पदाच्या परीक्षेतही या विद्यार्थ्याने घवघवीत यश मिळवले आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष श्री राहुल चिकोडे यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामीण आणि शेतकरी पाश्वभूमी असलेल्या या विद्यार्थ्यांच्या यशामुळे सातत्यपूर्ण कष्टाची तयारी असेल तर कोणत्याही परिस्थितीत यश खेचून आणता येईल असे मत संस्थेचे अध्यक्ष श्री राहुल चिकोडे यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना व्यक्त केले.

आपल्या सत्कारा प्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, स्पर्धा परीक्षांची तयारी करताना तुम्ही सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध अभ्यास केल्यास परीक्षेत मोठे यश मिळू शकते. अभ्यास क्रमाचे सखोल विवेचन, मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून अभ्यासाच नियोजन करून काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे. त्याचबरोबर या परीक्षांचा अभ्यास करताना मानसिक कस लागतो यासाठी लागणारी चिकाटी विद्यार्थ्यांकडे हवी असे मत नुकतेच राज्यसेवा परीक्षेतून कक्ष अधिकारी पदी निवड झालेल्या शिरीष पाटील यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री राहुल चिकोडे, एमपीएससी विभाग प्रमुख श्री अमित लव्हटे, प्रा.सोमनाथ सातपुते, प्रा.अमोल खोत, प्रा.संतोष कांबळे, सार्या कुलकर्णी, विद्या पाटील आदींसह विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *