शेणगांवमध्ये पूरग्रस्तांसाठी मोफत वैद्यकिय सेवा शिबिर संपन्न

भुदरगड/प्रतिनिधी
शेणगाव ता.भुदरगड येथे महापुराने बाधित झालेल्या नागरिकांसाठी अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनकल्याण समिती कोल्हापूर आणि सिद्धगिरी आरोग्यधाम कणेरी मठ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालयात एक दिवसीय वैद्यकिय आरोग्य शिबिर संपन्न झाले.दरम्यान या वैद्यकीय शिबिरात पुरुष १४४ तर महिला १८९ अशा ३३३ लोकांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत तपासणी व औषोधोपचार करण्यात आले. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या उद्देशाने पूर परिस्थितीशी दोन हात करणेसाठी आणि पूरग्रस्त लोकांना वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून ही सेवा पुरवण्यात आली. अशा पध्दतीची वैद्यकिय व स्वच्छता मध्ये संघ स्वयंसेवक सर्वत्र कार्यरत असल्याची माहिती यावेळी मान्यवरांनी दिली. अशी अनेक पूरबाधीत ठिकाणी ही सेवा देण्याचे प्रयोजन असल्याचे या आरोग्यधामचे जन संपर्क अधिकारी प्रविण सुतार व संघ स्वयंसेवक व भुदरगड तालुका कार्यवाह अँड जी टी ठाकूर यांनी सांगितले.
महापूराच्या पाण्यातून पूरग्रस्त गावातील लोकांना साथीचे(संसर्गजन्य)आजार निर्माण होऊ शकतात ह्याची गंभीरता ओळखून या गावांमधील पूरग्रस्त लोकांना वैद्यकीय सेवा पुरविणेत आली आहे.
या वैद्यकीय सेवेमध्ये सिध्दगिरी हॉस्पिटलचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.प्रविण नाईक यांचे व्यवस्थापन मोलाचे ठरले. यामध्ये डॉ.प्रदिप होडगे, परिचारिका प्रसन्ना घोगले, मोहिनी अभंगे, सलोनी धरणे, दिक्षा पालकर, ज्युनि. जनसंपर्क अधिकारी देवेंद्र पाटील,वाहन चालक रामदास सातकर हे सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *