कागल तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

जोपर्यंत वाळूमाफियांना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार -कागल तहसिलदार कार्यालय कर्मचारी.
कागल तहसीलदार कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी काम बंद आंदोलन केले. सिद्धनेर्ली येथील कोतवाल सुनील पाटील यांनी वाळूचा डंपर उतरत असताना डंपर ड्रायव्हर कडे वाळू परवाण्याची मागणी केली. त्यावेळी ड्रायव्हरने माझ्याकडे वाळू परवाना नाही म्हणून डंपर उतरला .हे चित्रीकरण कोतवाल सुनील पाटील यांनी केले .त्यावेळी ड्रायव्हरने आणखी पाच सहा जणांना फोनवरून बोलवून घेवून सुनील पाटील यांना गजाने मारहाण केली व मोबाईल फोडला त्यात ते गंभीर जखमी झाले. सदरची तक्रार कागल पोलीसात दिली . तक्रार देऊनही पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. म्हणून दिनांक 21 रोजी कारवाई करण्यासाठी तलाटी व कोतवाल संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले होते. परंतु कोणत्याही प्रकारची कारवाई झाल्या नसल्याने आज मंगळवारी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले .व तश्या प्रकारचे निवेदन प्रातांधीकारी त्रिगुन कुलकर्णी व तहासिलदार गणेश गोरे यांना दिले . कारवाई झाल्याशिवाय काम करणार नाही यावर सर्व कर्मचारी ठाम राहिले ,असताना प्रांताधिकारी म्हणाले सदरचा हाल्ला हा निंदनिय आहे.वाळूमाफियांची दादागीरीचे आम्ही समर्थन करणार नाही व खपवून घेणार नाहीं . त्यांच्यावर वरिष्ठ पातळीवर व्हावी यासाठी अम्ही प्रयत्न करणार आहोत . तुमच्या मागणीचा सकारात्मक विचार करत आहोत व काळ्या फिती लावून काम करत आहोत तुम्ही आपले काम सुरू करा .तुमच्या आंदोलनामुळे जनतेला फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो .असे म्हणत प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी काळ्या फिती लावून काम केले. वाळू माफिया हा शब्द खपवून घेतला जाणार नाही असे प्रांताधिकारी म्हणाले परंतु कर्मचारी आपल्या आंदोलनावर ठाम राहिले . जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत हे काम बंद आंदोलन सुरूच राहणार असे संघटणानी सांगीतले . या आंदोलनामुळे तहसीलदार कार्यालयातील संपूर्ण काम ठप्प झाले त्या मुळे लांबून येणाऱ्या नागरिकांना फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला .या काम बंद आंदोलनात कोल्हापूर जिल्हा महसूल संघटना शाखा कागल ,कागल राधानगरी उपविभाग ,कोल्हापूर जिल्हा तलाठी व मंडळ अधिकारी संघटना, कागल तालुका कोतवाल संघटना, तालुका तलाठी संघ कोल्हापूर ,जिल्हा चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना अशा विविध संघटनाचे कर्मचाऱ्यांनी भाग घेतला .
Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!