बेकायदेशीर गावटी बनावटीच्या बंदुका बाळगणाऱ्या टोळीस अटक:तीन बंदुका ,३७ जिवंत काडतूस व मोटरसायकलसह एकूण ५९हजार९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त :पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख

कोल्हापूर/प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यासह शस्त्रांची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्यावर कोल्हापूर पोलिसांच्या वतीने कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे.दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीद्बारे बेकायदेशीर अग्निशस्रे बाळगणाऱ्या टोळीस आज कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेने अटक करून त्यांच्या कडून तीन बंदुका,३७ जिवंत काडतूस आणि मोटरसायकल सह ५९हजार९०० रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोध्द आजरा पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती पोलीस अधिक्षक डॉ. अभिवन देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.रवींद्र यल्लापा नाईक(वय-४२,रा.हारुर पैकी धनगरवाडा, ता.आजरा),बाळू खाचू सुतार(वय-४८,रा.सुळगा ता.जि.बेळगाव),निलेश लक्ष्मण परब(वय-४१,रा.तेरसे बांबारडे),फारुक महमंद पटेल(वय-३१,रा.पटेल काँलनी आजरा)अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांना आजरा तालुक्यातील हारुर पैकी धनगरवाडा येथे राहणारा रवींद्र यल्लाप्पा नाईक हा बेकायदेशीर गावठी बनावटीची बंदुक व काडतुसे बाळगून वन्य प्राण्यांची शिकार करतो तसेच तो गावातील लोकांना धमकावत आहे .अशी गोपनीय माहिती मिळाली होती.त्यामुळे ही माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांच्या वतीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सावंत यांनी आपल्या अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक दादाराजे पवार ,पोलीस हेडकॉन्स्टेबल नरसिंग कांबळे,अमोल कोळेकर,पांडुरंग पाटील, प्रल्हाद देसाई ,जितेंद्र भोसले ,तुकाराम राजिगिरे यांचे तपास पथक तयार करून कारवाई करण्याच्या आदेश दिले. त्याप्रमाणे पोलिस पथकाने आज दिं. 4 एप्रिल रोजी रवींद्र नाईक( हारुर पैकी धनगर वाडा) यांच्या घरी छापा टाकला असता त्यांच्या घरात बेकायदेशीर गावठी बनावटीचे एक बारा बोअर बंदूक व ४ काडतुसे व एक रिकामे काडतुस असा एकूण 10 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल मिळाला. या हत्याराबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदर बंदुक फारुख महंमद पटेल (रा.पटेल कॉलनी आजरा) यांच्याकडून घेतल्याचे सांगितले .त्याप्रमाणे पोलिस पथकाने फारुक पटेल याला लाकुडवाडी फाट्यावर तो मोटारसायकल वरुन शिकारीला जात असतानाच पकडले. तर त्याच्या पाठीवर असलेल्या सँकमध्ये तपासणी केली असता त्यामध्ये फोल्डींगची बारा बोअरची एक बंदूक व १० काडतुसे सापडले.तसेच त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता आणखीन एक १६ बोअर ,दोन नळ्यांची बंदूक व २२ जिंवत काडतुसे असा ४९ हजार४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल असा दोन्ही आरोपींकडून एकूण तीन बेकायदेशीर बंदुका ,३७ काडतुसासह मोटारसायकल असा ५९ हजार ९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान पोलिस तपासात सदरची हत्यारे ही बेळगाव तालुक्यातील सुळगा येथील बाळू सुतार आणि तेरसे बांबारडे येथील निलेश परब यांनी पुरवल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ही अटक करण्यात आली. त्यामुळे चार आरोपी विरोधात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा आजरा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे,पोलिस उपअधिक्षक सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, पोलीस उपनिरीक्षक दादाराजे पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल नरसिंग कांबळे ,अमोल कोळेकर, पांडुरंग पाटील ,प्रल्‍हाद देसाई ,जितेंद्र भोसले ,तुकाराम राजगिरे, विठ्ठल मणिकेरी ,विलास किरोळकर, प्रकाश संकपाळ ,अनिल ढवळे ,अनिल पास्ते ,सचिन पाटील, सुरेश पवार ,प्रदीप नाकील, रफिक आवळकर, नामदेव यादव, रमेश दोईफोडे ,यशवंत उपराटे,अमर आडसुळे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *