आयडीबीआय बँक लिमिटेडने मॅक्स बुपाशी केला स्टॅण्डअलोन हेल्थ इन्शुरन्स टाय-अप

आयडीबीआय बँक लिमिटेड आणि स्टॅण्डअलोन हेल्थ इन्शुअरर (एसएएचआय) मॅक्स बुपा यांनी एका बँकॅश्युरन्स कॉर्पोरेट एजन्सी करारावर १ जून, २०१९ रोजी स्वाक्षऱ्या केल्या. ओपन आर्किटेक्चरखाली एसएएचआय भागीदारीसाठी आयडीबीआय बँक एक कॉर्पोरेट एजंट म्हणून बोर्डावर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. या कराराचा भाग म्हणून मॅक्स बुपा आयडीबीआय बँक लिमिटेडच्या देशभरातील वैविध्यपूर्ण ग्राहकवर्गाला आपली सर्वसमावेशक आरोग्य विमा सेवा देईल.या सहयोगाच्या माध्यमातून मॅक्स बुपा आरोग्य विमा उत्पादनांची विस्तृत श्रेणी ग्राहकांना देऊ करेल. तसेच बँकेच्या भारतभरात पसरलेल्या १८००हून अधिक शाखांमधील २० दशलक्ष ग्राहकांसाठी खास तयार केलेली डिजिटल उत्पादनेही प्रथमच ऑफर केली जातील.
आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राकेश शर्मा यावेळी म्हणाले, “आयडीबीआयमध्ये आम्ही कायमच ग्राहकांच्या गरजा समजून घेण्यासाठी व त्यांच्या वित्तीय आवश्यकता पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असतो. आम्ही मॅक्स बुपासोबत केलेली भागीदारी हा सर्वोत्तम दर्जाच्या विमा उत्पादनांसाठी ग्राहकांकडून होत असलेली मागणी पूर्ण करण्याचाच भाग आहे. मॅक्स बुपासोबत झालेल्या सहयोगाच्या माध्यमातून आम्ही ग्राहककेंद्री डिजिटल क्षमतेची आरोग्यविमा उत्पादने ग्राहकांना देऊ शकू.”
ते पुढे म्हणाले, “आयडीबीआय बँक त्रयस्थ पक्षामार्फत वितरणातून येणाऱ्या मुक्त उत्पन्नावर अधिक भर देत आहे. हा टाय-अप म्हणजे त्याच दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.”
मॅक्स बुपाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिष मेहरोत्रा म्हणाले, “आयडीबीआय बँकेसोबत भागीदारी करणे आमच्यासाठी खूपच सुखद अनुभव आहे आणि बँकेच्या २० दशलक्ष ग्राहकांना अधिक निरोगी, अधिक यशस्वी आयुष्य जगण्यात मदत करण्यास आम्ही बांधील आहोत. शिवाय, आयडीबीआय बँक आणि मॅक्स बुपा यांच्यात बरीच साम्यस्थळे आहेत. ग्राहकांना प्राधान्य देणे, बाजारपेठेतील भक्कम पत आणि भारतभर विस्तारलेले कार्यक्षेत्र या गोष्टी दोन्ही कंपन्यांकडे आहेत. आयबीआयच्या देशभर पसरलेल्या विभागांना ग्राहककेंद्री सर्वंकष आरोग्यविषयक सोल्युशन्स पुरवण्यासाठी सर्वोत्तम दर्जाची डिजिटल उत्पादने देण्यावर आमचा भर असेल.”
ते पुढे म्हणाले, “एक विभाग म्हणून आरोग्यविमा भारतात अद्याप नवजात स्वरूपामध्ये आहे. आरोग्यविमा विभागाचा बाजारातील शिरकाव (पेनिट्रेशन)केवळ २७ टक्के आहे. याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तेच दर्जेदार विमा उत्पादने ग्राहकांना सहज उपलब्ध करण्यासाठी आमच्यासारख्या आरोग्य विमाकंपन्यांनी जोरात प्रयत्न करणे आवश्यक आहे. आमची उत्पादने अधिकाधिक ग्राहकांना उपलब्ध व्हावीत यासाठी मॅक्स बुपा कार्यक्षेत्राचा विस्तार भारतभरात करत आहे. आयडीबीआयसोबत केलेला बँकॅश्युरन्स करार हे या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.”
ही उत्पादने पुढीलप्रमाणे – आयडीबीआय मॅक्स बुपा सुविधा हेल्थ प्लस, आयडीबीआय मॅक्स बुपा लोन सिक्युअर आणि आयडीबीआय मॅक्स बुपा सेहत सुरक्षा. मॅक्स बुपा आयडीबीआय बँकेच्या ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाची सेवा पुरवेल. यामध्ये कॅशलेस दाव्यांचे ३० मिनिटांत प्रीअथॉरायझेशन आणि देशभरातील आघाडीच्या रुग्णालयांच्या साखळीत ‘पॉइंट ऑफ केअर’ची उपलब्धता आदींचा समावेश होतो.
याशिवाय, मॅक्स बुपा आयडीबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी एक डिजिटल परिसंस्था डिझाइन करणार आहे. यामुळे ग्राहकांचा एकंदर अनुभव सुधारेल. मॅक्स बुपा ‘इन्फिनिटी’ हा स्वत: विकसित केलेला डिजिटल प्लॅटफॉर्म इन्स्टॉल करून त्याचे बँकेच्या प्रणालीत एकात्मीकरण करणार आहे. यामुळे ग्राहकांना विनाअडथळा उत्पादनांची खरेदी करता येईल. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बँकेचे ग्राहक त्यांच्या पसंतीची उत्पादने तत्काळ खरेदी करू शकतील आणि त्यांच्या पॉलिसीची कागदपत्रे बँकेच्या शाखेतूनच उपलब्ध करून घेऊ शकतील. याशिवाय मॅक्स बुपा देशभरातील अनेक आयडीबीआय शाखांमध्ये एनीटाइमहेल्थ (एटीएच) मशिन्स बसवणार आहे. हे पूर्णपणे स्वयंचलित, तंत्रज्ञानाधारित मॉडेल असून यामुळे ग्राहकांना आपल्या आरोग्याचे मूल्यांकन व पॉलिसी खरेदी तत्काळ- ३ मिनिटांहून कमी वेळात- करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *