ह्युमन राईट मिरर
Friday, 24 May 2019

मानवी हक्क या विषयावर जनजागृती करणारे शिबीर संपन्न

कोल्हापूर :- शिवाजी विद्यापीठ येथील जैवतंत्रज्ञान विभागाचे एम एस्सी भाग – 2 च्या विद्यार्थ्यांनी युथ फॉर हयुमन राईटस अंतर्गत मानवी हक्क या विषयावर जनजागृती करणारे एकदिवसीय शिबीर पार पाडले . हे शिबीर मोरेवाडी येथील लिटिल फ्लोवर इंग्लिश मेडियम स्कूल येथे आयोजीत केले होते.त्याअंतर्गत इ 7वी, 8वी, आणि 9वी च्या विद्यार्थ्यांमध्ये मानवी हक्कांबाबत जनजागृती करण्याचे काम केले या कार्यक्रमास शालेय विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद देऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यास मोलाचे सहकार्य केले . जैवतंत्रज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांनी नाटय रूपांतर करून मानवी हक्काबाबत
जनजागृती केली, तसेच समाजात अजूनही काही भागात मानवी हक्कांचे उल्लंघन कशापध्दतीने होते त्याची जाणीव करून दिली त्याचबरोबर मानवी हक्कांचे उल्लंघन रोखण्यासाठी आपण प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कशा पध्दतीने भाग घेऊ शकतो याची माहिती दिली. ही माहिती देताना, दैनंदिन जिवनातील उदाहरणे नाटयरूपात सादर करून बालमनावर त्यांचे हक्क बिंबवण्याचे काम केले या प्रयोगास शालेय मुलांनी उत्फुर्त प्रतिसाद देत चर्चात्मकरित्या संवाद साधला. या कार्यक्रमास जैवतंत्रज्ञान विभागाच्या प्रा डॉ मनिषा राजेभोसले व प्राध्यापक डॉ अमित सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच जैवतंत्रज्ञान
विभागाच्या विभागप्रमुख प्रा डॉ ज्योती जाधव, प्रा डॉ व्ही ए बापट व डॉ सुषमा पाटील यांचे या कार्यक्रमास मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *