आशा व गटप्रवर्तकांचे प्रलंबित मागण्यांसाठी ७ ऑगस्टला राज्यव्यापी आंदोलन

कोल्हापूर/प्रतिनिधी
जिल्ह्यासह राज्यातील आशा व गटप्रवर्तकांच्या किमान वेतनासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी सिटू (CITU) संलग्न आशा वर्कर्स युनियनच्या वतीने वारंवार आंदोलने, निदर्शने करून मोर्चे काढण्यात आले. मात्र याकडे शासनाने लक्ष न दिल्याने याच्या निषेधार्थ आशा वर्कर्स युनियनच्या वतीने दिं.७ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्षा कॉ.नेत्रदिपा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात सर्व आशा व गटप्रवर्तक राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM)अंतर्गत कार्यरत असून ग्रामीण व शहरी भागातील जनतेस सार्वजनिक आरोग्य सेवा देणे, नवजात बालकांचे लसीकरण मोहीम, विविध संसर्गजन्य रोगांना अटकाव घालणे यासह विविध सेवा जनतेस वेळेची तमा न बाळगता देत असतात. मात्र आशा व गटप्रवर्तकांच्या किमान वेतनासह अन्य प्रश्न अनेक वर्ष झाले प्रलंबित आहेत. त्यासाठी वारंवार आंदोलन ,निदर्शने करून मोर्चे काढण्यात आले. ४जून २०१९रोजी आझाद मैदानावर मोठी निदर्शने करण्यात आली.तर आशा व गटप्रवर्तकांची ५०लाख सह्यांची मोहीम राबवून सह्यांचे निवेदन पंतप्रधान कार्यालयाकडे ही देण्यात आले आहे.तरी सरकार आशा व गटप्रवर्तकांच्या प्रलंबित विविध मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने याच्या निषेधार्थ दि.७ ऑगस्ट रोजी आशा व गटप्रवर्तकांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याच जिल्हाध्यक्षा कॉ.नेत्रदिपा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पत्रकार परिषदेला कॉ.चंद्रकांत यादव यांच्या सह सचिव कॉ.संगीता पाटील,जनरल सेक्रेटरी कॉ.उज्वला पाटील, ज्योती तावरे,उज्वला जडे,वसुधा बुडके,पुनम माळी,सुरैया तेरदाळे,सुरेखा मोहिते, मनिषा पाटील, शुभांगी सणगर उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *